July 15, 2025 12:44 PM

views 16

अमरनाथ यात्रेसाठी आलेल्या ६  हजार ३८८ यात्रेकरूंचा जथा काश्मीर खोऱ्याकडे रवाना

जम्मू मध्ये भगवती नगर यात्री निवास बेस कॅम्प वरून आज सकाळी अमरनाथ यात्रेसाठी आलेल्या ६  हजार ३८८ यात्रेकरूंचा जथा कडक सुरक्षा व्यवस्थेत काश्मीर खोऱ्याकडे रवाना झाला.   यापैकी २ हजार ५०१ यात्रेकरू बालताल  मार्गे, तर ३ हजार ८८७ यात्रेकरू पहलगाम मार्गे अमरनाथ गुंफांच्या दर्शनासाठी मार्गस्थ होतील.

July 14, 2025 12:25 PM

views 15

जम्मू काश्मिरमध्ये अमरनाथ यात्रेकरूंचा आणखी एक जथा जम्मूहून रवाना

जम्मू काश्मिरमध्ये अमरनाथ यात्रेकरूंचा आणखी एक जथा आज सकाळी जम्मूहून रवाना झाला. भगवती नगर यात्री निवासातून काश्मिरसाठी निघालेल्या या जथ्थ्यात ६ हजार १४३ यात्रेकरू आहेत.   १०० वाहनांचा पहिला ताफा २ हजार २१५ यात्रेकरूंना घेऊन बालतालकडे जाण्यासाठी तर १३५ वाहनांचा दुसरा ताफा ३ हजार ९२८ यात्रेकरूंना घेऊन पहलगाम कडे जाण्यासाठी निघाला. अमरनाथ यात्रेदरम्यान आतापर्यंत दोन लाखांहून अधिक यात्रेकरूंनी अमरनाथ गुंफेपर्यंत पोहचून दर्शन घेतलं आहे.

July 8, 2025 9:46 AM

views 17

Amarnath Yatra 2025 : ९३ हजारांहून अधिक भाविकांन घेतलं दर्शन

अमरनाथ यात्रा सुरळीत सुरू असून काल २३,८५७ भाविकांनी दर्शन घेतलं. पहिल्या सहा दिवसांत दर्शन घेणाऱ्या यात्रेकरूंची संख्या ९३ हजारांहून अधिक झाली असून, आज हा संख्या एक लाखाच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.   दरम्यान, कडक सुरक्षा व्यवस्थेत काल जम्मूतील भगवती नगर तळावरून ७५४१ यात्रेकरूंची सातवी तुकडी पुढील तळाकडे रवाना झाली. यापैकी ३३२१ यात्रेकरू आज पहाटे बालाताल तळाकडे आणि ४२२० पहलगाम तळाकडे रवाना झाले, तिथून ते अमरनाथकडे निघतील.

July 2, 2025 3:03 PM

views 15

अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी रवाना

अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी आज रवाना झाली. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज पहाटे भगवती नगर इथं यात्रेकरूंना हिरवा झेंडा दाखवला. या तीर्थयात्रेसाठी एकूण ५ हजार ८९२ यात्रेकरू रवाना झाले आहेत. २ हजार ४८७ यात्रेकरु बालताल मार्गाने तर ३ हजार ४०३ यात्रेकरु पहलगाम मार्गाने अमरनाथला पोहोचतील. यात्रेचा समारोप ९ ऑगस्टला श्रावण पौर्णिमेच्या दिवशी होणार आहे. सरकारनं पुरवलेल्या सुविधा आणि सुरक्षेबद्दल यात्रेकरुंनी समाधान व्यक्त केलं आहे.

June 6, 2025 3:20 PM

views 34

अमरनाथ यात्रेसाठी ‘ऑपरेशन शिवा’ ही व्यापक सुरक्षा मोहीम सुरू

जम्मू आणि काश्मीरमध्ये, येत्या ३ जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेला कडेकोट सुरक्षा प्रदान करण्यासाठी लष्करानं ‘ऑपरेशन शिवा’ ही व्यापक सुरक्षा मोहीम सुरू केली आहे. २२ एप्रिलला पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, लष्करानं केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, जम्मू आणि काश्मीर पोलिस आणि श्री अमरनाथजी श्राइन बोर्ड यांच्या समन्वयाने यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी कडक उपाययोजना केल्या आहेत.