August 1, 2025 1:12 PM August 1, 2025 1:12 PM

views 8

अमरनाथ यात्रा प्रतिकूल हवामानामुळे दुसऱ्या दिवशीही स्थगित

जम्मूमधून निघणारी अमरनाथ यात्रा प्रतिकूल हवामानामुळे आज सलग दुसऱ्या दिवशीही स्थगित झाली. भगवती नगर यात्रेकरु थांबले असून तिथे  कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. ही यात्रा गेल्या महिन्यात ३ तारखेला सुरू झाली. आतापर्यंत ४ लाखांहून अधिक यात्रेकरूंनी अमरनाथ गुंफेत जाऊन दर्शन घेतलं आहे. मात्र, १७ जुलै रोजी पहलगाम आणि बालताल इथल्या तळांच्या परिसरात मुसळधार पाऊस झाल्यामुळे ही यात्रा स्थगित करण्यात आली होती. अमरनाथ यात्रा येत्या ९ तारखेला श्रावण पौर्णिमेला संपणार आहे. 

July 24, 2025 12:31 PM July 24, 2025 12:31 PM

views 15

अमरनाथ यात्रेसाठी ३५०० भाविकांची नवी तुकडी रवाना

अमरनाथ यात्रेसाठी आज जम्मू इथल्या शिबीरांतून साडेतीन हजार भाविकांची नवी तुकडी रवाना झाली. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, यात्रा सुरू झाल्यापासून गेल्या २१ दिवसांत ३ लाख ४२ हजारापेक्षा जास्त भाविकांनी अमरनाथ यात्रा पूर्ण केली असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान सध्या दशनामी आखाड्यात वास्तव्याला असलेली छडी मुबारक ४ ऑगस्ट रोजी अमरनाथ मंदिरासाठी प्रस्थान करेल, ती ९ तारखेला मंदिरात पोहचल्यावर या यात्रेचा अधिकृत समारोप होईल असंही या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

July 11, 2025 9:55 AM July 11, 2025 9:55 AM

views 15

अमरनाथ यात्रा उत्साहात सुरू

काश्मीरच्या खोऱ्यात अधून मधून सुरू असलेल्या पावसातही अमरनाथ यात्रा उत्साहात सुरू आहे. आतापर्यंत १ लाख ४५ हजारांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले असून काल १७ हजारांहून अधिक यात्रेकरूंनी दर्शन घेतले. ही यात्रा ९ ऑगस्ट पर्यन्त चालेल.

July 7, 2025 2:24 PM July 7, 2025 2:24 PM

views 10

अमरनाथ यात्रेसाठी सहावी तुकडी रवाना

श्री अमरनाथ यात्रेसाठी जम्मूतील भगवती नगर यात्री निवास बेस कॅम्प इथून आज सकाळी ८ हजार ६५० भाविकांची सहावी तुकडी रवाना झाली. यापैकी ३ हजार ४८६ भाविक बालटाल मार्गाने आणि ५ हजार ११९ भाविक पहलगाम मार्गाने पवित्र गुहेत जातील. यंदा या यात्रेदरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

July 6, 2025 1:23 PM July 6, 2025 1:23 PM

views 14

अमरनाथ यात्रेसाठी यात्रेकरूंची पाचवी तुकडी रवाना

अमरनाथ यात्रेसाठी ७ हजार २०८ यात्रेकरूंची पाचवी तुकडी ३०७ वाहनांच्या ताफ्यात जम्मूतल्या भगवती नगर यात्री निवास बेस कॅम्प इथून आज सकाळी काश्मीर खोऱ्यासाठी रवाना झाली.  यात ५ हजार २५८ पुरुष, १ हजार ५८७ महिला, ३० मुलं, २७७ साधू आणि ५६ साध्वींचा समावेश होता. यापैकी ३ हजार १९९ यात्रेकरू बालताल बेस कॅम्पला आणि ४ हजार ९ यात्रेकरू पहलगाम बेस कॅम्पला गेले. तिथून ते श्री अमरनाथाच्या दर्शनासाठी पुढल्या प्रवासाला निघतील.

July 3, 2025 2:43 PM July 3, 2025 2:43 PM

views 19

अमरनाथ यात्रेला सुरूवात

अमरनाथ यात्रेला सुरूवात झाली असून दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातल्या पहलगाम आणि मध्य काश्मीरमधील गंदरबल जिल्ह्यातल्या बालताल या दोन्ही मार्गांवरून कडक सुरक्षेत यात्रेकरू रवाना झाले.   २६८ वाहनांमधून यात्रेकरू रवाना झाले असून यापैकी १ हजार ९९३ यात्रेकरू बालटालला आणि ३ हजार २५३ यात्रेकरू पहलगामकडे रवाना झाले आहेत.    या यात्रेकरूंना दोन्ही मार्गांवरून पवित्र गुहेकडे जाण्याची परवानगी देण्यात आली असून ही गुहा हिमालयात १२ हजार ७५६ फूट उंचीवर आहे. 

July 2, 2025 3:03 PM July 2, 2025 3:03 PM

views 15

अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी रवाना

अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी आज रवाना झाली. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज पहाटे भगवती नगर इथं यात्रेकरूंना हिरवा झेंडा दाखवला. या तीर्थयात्रेसाठी एकूण ५ हजार ८९२ यात्रेकरू रवाना झाले आहेत. २ हजार ४८७ यात्रेकरु बालताल मार्गाने तर ३ हजार ४०३ यात्रेकरु पहलगाम मार्गाने अमरनाथला पोहोचतील. यात्रेचा समारोप ९ ऑगस्टला श्रावण पौर्णिमेच्या दिवशी होणार आहे. सरकारनं पुरवलेल्या सुविधा आणि सुरक्षेबद्दल यात्रेकरुंनी समाधान व्यक्त केलं आहे.

June 27, 2025 11:10 AM June 27, 2025 11:10 AM

views 13

श्रीनगरमधील राजभवनात येत्या तीन जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठीच्या तयारीबद्दल चर्चा

जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी श्रीनगरमधील राजभवनात राजकीय नेत्यांबरोबर काल बैठक घेऊन येत्या तीन जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठीच्या तयारीबद्दल चर्चा केली. या बैठकीला मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि भाजप, काँग्रेस आणि पीडीपीचे पक्षनेते उपस्थित होते.

June 17, 2025 8:02 PM June 17, 2025 8:02 PM

views 9

अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी दोन्ही यात्रामार्ग ‘नो फ्लाईंग झोन’ घोषित

अमरनाथ यात्रेदरम्यान सुरक्षेचा उपाय म्हणून आजपासून जम्मू काश्मीर प्रशासनाने यात्रेच्या सर्व मार्ग नो- फ्लाईंग झोन घोषित केले आहेत. पहलगाम आणि बालताल या दोन्ही ठिकाणाहून जाणाऱ्या रस्त्यांना हा निर्णय लागू केल्याचा आदेश नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी जारी केला आहे. यात्रा मार्गांवर यूएव्ही, ड्रोन किंवा तरंगते फुगे सोडण्यावर बंदी घातली आहे. मात्र सुरक्षा यंत्रणाना या नियमातून सूट दिली आहे.  नो - फ्लाईंग झोनचा नियम १ जुलैपासून १० ऑगस्टपर्यंत अमलात राहील. अमरनाथ यात्रा येत्या ३ जुलैपासून सुरु होत अस...

May 30, 2025 12:48 PM May 30, 2025 12:48 PM

views 7

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली काल रात्री जम्मूमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. येत्या ३ जुलैपासून सुरू होत असलेल्या अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा आणि इतर व्यवस्थेचाही शाह यांनी या बैठकीत आढावा घेतला. या यात्रेसाठी करण्यात आलेल्या सुरक्षा उपाययोजनांबद्दल त्यांना माहिती देण्यात आली. शहा यांचं दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यासाठी काल जम्मूमध्ये आगमन झालं. ते आज पूंछला भेट देणार असून तिथं पाकिस्तानच्या गोळीबारामुळे नुकसान झाले...