August 3, 2025 8:06 PM August 3, 2025 8:06 PM

views 3

खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा वेळे आधीच स्थगित

वार्षिक अमरनाथ यात्रा प्रतिकूल हवामान आणि खराब रस्ते या कारणांमुळे आजपासून स्थगित करण्यात आली आहे. ही यात्रा ९ ऑगस्ट रोजी समाप्त होणार होती. तीन दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली होती.   मात्र बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्ग यात्रेसाठी सुरक्षित नसून या मार्गांवरून यात्रा पुन्हा सुरू होणार नसल्याची घोषणा काल अधिकाऱ्यांनी केली. यावर्षी सुमारे चार लाख यात्रेकरूंनी अमरनाथ गुहेचं दर्शन घेतलं आहे.

July 14, 2024 3:21 PM July 14, 2024 3:21 PM

views 5

Amarnath Yatra 2024: चार हजार ८८९ यात्रेकरुंचा जत्था जम्मूच्या भगवती नगर शिबीरातून रवाना

अमरनाथ यात्रेसाठी चार हजार ८८९ यात्रेकरुंचा जत्था आज जम्मू इथल्या भगवती नगर शिबीरातून रवाना झाला.   सुमारे १८७ वाहनांमधून यात्रेकरुंनी आज सकाळी आपल्या प्रवासाला सुरुवात केली. यामध्ये ३ हजार ६७२ पुरुष, एक हजार ८६ महिला, २१ बालकं, ८८ साधू आणि २२ साध्वी यांचा समावेश आहे.   यापैकी १ हजार ८९६ यात्रेकरू, पहाटे बालताल बेस कॅम्पसाठी रवाना झाले तर २ हजार ९९३ यात्रेकरू पहलगाम बेस कॅम्पसाठी रवाना झाले. तिथून ते पवित्र गुहेच्या दिशेनं पुढे मार्गक्रमण करतील.

June 29, 2024 8:13 PM June 29, 2024 8:13 PM

views 14

अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात

अमरनाथ यात्रेला आज सुरुवात झाली. अमरनाथ यात्रेसाठी जम्मूतल्या भगवती नगर बेस कॅम्प इथून आज पहाटे चार हजार २९ यात्रेकरूंची दुसरी तुकडी रवाना झाली. कडेकोट सुरक्षेसह यात्रेकरूंच्या २०० वाहनांचा ताफा काश्मीर खोऱ्याकडे रवाना झाला. तत्पूर्वी बेस कॅम्पचा परिसर बम बम भोले, हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. जम्मू बेस कॅम्प इथून आतापर्यंत आठ हजार ६३२ यात्रेकरू अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले आहेत. हेलिकॉप्टर सेवेद्वारे पोहोचलेल्या तीन हजारहून अधिक यात्रेकरूंनी आज  पवित्र गुफेत शिवलिंगाचे दर्शन घेत...