January 12, 2025 7:33 PM January 12, 2025 7:33 PM

views 8

अमरावती जिल्ह्यात शंभरहून अधिक महिलांना विषबाधा

अमरावतीजवळच्या नांदगाव पेठ इथल्या औद्योगिक वसाहतीतल्या गोल्डन फायबर कंपनीत काम करणाऱ्या शंभरहून अधिक महिलांना आज सकाळपासून  मळमळ  आणि डोकेदुखीचा त्रास होत होता. दुपारनंतर यातल्या शंभरहून अधिक महिलांना विषबाधा झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्यांना  जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आलं.   दरम्यान, या महिला नेहमीप्रमाणं कामावर हजर झाल्यानंतर पाणी प्यायल्यावर त्यांना हा त्रास सुरू झाल्याचं एका महिलेनं सांगितलं.

November 9, 2024 6:54 PM November 9, 2024 6:54 PM

views 11

महायुुतीचं सरकार आल्यानंतर राज्यातली प्रशासन व्यवस्था कोलमडली – मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

काँग्रेसनं कायमच लोकशाही आणि संविधान यांचं रक्षण आणि संवर्धन केलं आहे, असं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अमरावती इथं प्रचारसभेत सांगितलं. विचारावर, तत्वावर, कामावर टीका करावी व्यक्तिगत टीका करु नये, असंही ते म्हणाले.  नरेंद्र मोदींनी खोटी आश्वासनं दिली, शेतकऱ्यांना हमीभाव, महिलांना सुरक्षितता, तरुणांना रोजगार काहीही मिळालं नाही असा आरोप खर्गे यांनी केला. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर शेतकरी, महिला, युवा यांच्यासाठी कल्याणकारी योजना आणू, असं आश्वासन खर्गे यांनी दिलं.  बाई...