December 14, 2024 2:29 PM

views 15

अभिनेता अल्लू अर्जूनची हैदराबादच्या तुरुंगातून सुटका

अभिनेता अल्लू अर्जूनची हैदराबादच्या चंचलगुडा केंद्रीय तुरुंगातून आज सकाळी सुटका करण्यात आली. पुष्पा टू सिनेमाच्या प्रिमियरच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात अर्जुनला काल अटक झाली होती. त्यानंतर सायंकाळी तेलंगण उच्च न्यायालयानं त्याला चार आठवड्यांचा हंगामी जामीन मंजूर केला. दरम्यान, पुष्पा टू सिनेमाच्या प्रिमियरच्या वेळी संध्या चित्रपटगृहात झालेली दुर्घटना ही राज्य आणि स्थानिक प्रशासनाच्या ढिसाळ व्यवस्थेसंबंधीची बाब असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विन...

December 13, 2024 8:37 PM

views 14

अभिनेता अल्लू अर्जूनला चार आठवड्यांचा हंगामी जामीन मंजूर

चित्रपट अभिनेता अल्लू अर्जूनला हैदराबाद उच्च न्यायालयानं चार आठवड्यांचा हंगामी जामीन मंजूर केला आहे. हैदराबादमधे चित्रपटाच्या प्रिमिअरच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी आज त्याला अटक झाली होती.     अल्लू अर्जूनला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला स्थानिक न्यायालयात हजर केलं होतं. न्यायालयानं त्याला १४ दिवसांची रिमांड दिली होती. हा गुन्हा रद्द करावा, यासाठी अर्जूननं लगेच उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याच्या अर्जाची सुनावणी करताना उच्च न्यायालयानं ५० हजार रुपयांच्य...

December 13, 2024 3:28 PM

views 20

चेंगराचेंगरी प्रकरणी तेलुगु अभिनेचा अल्लू अर्जुन याला अटक

पुष्पा २ या चित्रपटाच्या खेळादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी आज तेलुगु अभिनेचा अल्लू अर्जुन याला अटक केली आहे. ४ डिसेंबर रोजी हैदराबाद इथल्या एका चित्रपटगृहात पुष्पा -२ या चित्रपटाच्या प्रिमिअर खेळा दरम्यान चेंगराचेंगरी सदृष स्थिती निर्माण झाली होती. या खेळाच्या वेळी उपस्थित असलेल्या अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ती अनियंत्रित झाल्याने एकच गोंधळ उडाला. या खेळादरम्यान चित्रपटाची टीम उपस्थित राहणार असल्याची पूर्व सूच...