July 31, 2025 9:41 AM July 31, 2025 9:41 AM

views 1

राष्ट्रपती मुर्मू आज झारखंडमधील AIIMS च्या पहिल्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज झारखंडमधील देवघर येथील AIIMSच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत. दीक्षांत समारंभात त्या ४ सुवर्णपदक विजेत्या आणि ५ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करतील.   राष्ट्रपती उद्या आयआयटी-आयएसएम धनबादच्या ४५ व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील, जिथे त्या २० सुवर्णपदक विजेत्यांचा सत्कार करतील.   त्यांच्या भेटीपूर्वी देवघर, धनबाद आणि रांची या झारखंडमधील तिन्ही शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.