August 24, 2025 3:38 PM August 24, 2025 3:38 PM
41
अखिल भारतीय विधिमंडळ पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेचं अमित शहा यांच्या उपस्थितीत उद्घाटन
स्वातंत्र्यप्राप्तीप्रमाणेच देशाची लोकशाही अबाधित ठेवणं हेही महत्वाचं असून विठ्ठलभाई पटेल यांनी भारतीय संकल्पनांवर आधारित लोकशाहीचा पाया घालण्याचं काम केलं, अस केंद्रीय गृहमंती अमित शाह यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज नवी दिल्लीत अखिल भारतीय विधिमंडळ पीठासीन अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय परिषदेचं उदघाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते. देशाच्या संसदेची आणि पीठासीन अधिकाऱ्यांची प्रतिष्ठा राखणं महत्वाचं असून विधिमंडळं ही जनतेचा आवाज पोहोचवण्याचं माध्यम बनायला हवी असं ते म्हणाले. देशाच्या केंद्रीय का...