December 26, 2024 3:17 PM December 26, 2024 3:17 PM

views 43

अकोल्यात उद्यापासून २९ डिसेंबरपर्यंत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अकोल्याचं डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, राज्यशासनाचा कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने उद्यापासून येत्या २९ डिसेंबरपर्यंत राज्यस्तरीय  कृषी प्रदर्शन अकोला इथं भरवण्यात येणार आहे.  प्रदर्शनाचं  उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अन्य मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या प्रदर्शना...

November 7, 2024 7:04 PM November 7, 2024 7:04 PM

views 19

…म्हणून विरोधक महिलांसाठी योजना जाहीर करत आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

केंद्र आणि राज्य सरकारचं डबल इंजिन महाराष्ट्राचा विकास करत आहे. महाराष्ट्राचा विकास पाहून विरोधकांच्या पोटात दुखलं आणि त्यांनी खटले दाखल केले. परंतु याचा फटका आपल्यालाच बसेल हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर आता हे विरोधक महिलांसाठी योजना जाहीर करत असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. अकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यात वाडेगाव इथं महायुतीच्या प्रचार सभेत  बोलत होते.   राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा येईल असा विश्वास शिंदे व्यक्त  करत  सत्तेत आळ्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात दर...

September 10, 2024 3:26 PM September 10, 2024 3:26 PM

views 6

अकोला जिल्ह्यातील १ हजार ८२५ शाळांमध्ये सखी सावित्री समित्या स्थापन

शालेय विद्यार्थ्यांच्या  सुरक्षिततेच्या दृष्टीने अकोला जिल्ह्यातल्या १ हजार ८२५ शाळांमध्ये गेल्या ६ तारखेपर्यंत सखी सावित्री समित्या स्थापन करण्यात आल्या असून शाळा स्तरावर या समित्यांकडून विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. अलीकडच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये या समित्या स्थापन करण्याची उपयुक्तता अधिक वाढली आहे. त्याअनुषंगाने अकोला जिल्ह्यात जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आणि अनुदानित तसंच विनाअनुदानित १ हजार ८३५ पैकी १ हजार ८२५ शाळांम...

August 20, 2024 3:46 PM August 20, 2024 3:46 PM

views 9

अकोला जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नावांची यादी ई पंचनामा पोर्टलवर अपलोड करण्याचं सुरू

गेल्या वर्षी फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानासाठी अकोला जिल्ह्यातल्या २७ हजार ६८० शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत ५४ कोटी ५५ लाख रुपयांची मदत मंजूर झाली आहे. या मदतीच्या अनुषंगाने जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नावांची यादी ई पंचनामा पोर्टलवर अपलोड करण्याचं काम १४ ऑगस्टपासून महसूल प्रशासनानं सुरू केलं आहे. या याद्यांचं काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होणार आहे.