May 23, 2025 3:30 PM May 23, 2025 3:30 PM

views 11

अकोला जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा

अकोला जिल्ह्यातल्या सातही तालुक्यांमधल्या १५७ गावांना गेल्या चार दिवसांत  वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसल्यानं  सुमारे ९०९  हेक्टर क्षेत्रावरच्या  पिकांचं  मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अकोला  जिल्हाधिकारी कार्यालयानं काल अमरावती विभागीय आयुक्तांकडे असा अहवाल पाठवला आहे.    या पावसानं  लिंबू, उन्हाळी ज्वारी, आंबा, मूग, कांदा, भुईमूग, केळी, संत्रा, सीताफळ आणि पपई यांसारख्या पिकांचं  नुकसान झालं  आहे. पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यात १५ घरांची पडझड झाली असून संबंधित घरांचं  अंशतः नुक...

March 23, 2025 3:20 PM March 23, 2025 3:20 PM

views 5

अकोला : शेतीच्या वस्तूंवरचा GST कर रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी

रासायनिक खतं, कीटकनाशकं, शेतीची  औजारं यांच्यासह शेतीसाठीच्या आवश्यक वस्तूंवरचा जीएसटी कर रद्द करावा, किंवा त्याचा परतावा द्यावा अशी मागणी अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडून होत आहे. कृषीसंबंधी वस्तूंवर ५ ते २८ टक्क्यांपर्यंत जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर आकारला जातो, त्यामुळे  शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात हेक्टरी जवळपास १५ हजारांची वाढ झाली असल्याचा शेतकऱ्यांचा दावा असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 

March 9, 2025 3:31 PM March 9, 2025 3:31 PM

views 11

ई-ऑफिस प्रणालीत अकोला जिल्हा परिषद अव्वल

शासनाच्या ई-ऑफिस प्रणाली वापराच्या उपक्रमात अकोला जिल्हा परिषद अव्वल ठरली आहे. अकोला जिल्हा परिषदेने गेल्या ७ महिन्यांच्या कालावधीत ५१ हजार २३१ 'ई-ऑफिस फाइल्स' तयार केल्या आहेत. गेल्या ऑगस्टपासून अकोला जिल्हा परिषद प्रशासनामार्फत 'ई-ऑफिस' प्रणालीमध्ये कामकाज सुरू करण्यात आलं आहे.

February 23, 2025 3:23 PM February 23, 2025 3:23 PM

views 8

अकोल्यात पाणलोट विकास यात्रेला आजपासून सुरुवात

अकोला जिल्ह्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत  पाणलोट विकास यात्रेला आजपासून सुरुवात झाली. पाणलोट व्यवस्थापनाबाबत जनजागृतीसाठीची ही यात्रा बाळापुर तालुक्यातील बटवाडी बुद्रुक आणि बटवाडी खुर्द इथून सुरु झाली. अकोला जिल्ह्यातल्या बारा गावांमध्ये  २८ फेब्रुवारीपर्यंत हा उपक्रम राबवण्यात येईल. 

January 31, 2025 3:48 PM January 31, 2025 3:48 PM

views 6

अकोल्यात जीबीएसचे ४ रुग्ण

पुण्यात आढळून आलेल्या जीबीएस अर्थात गुइलेन-बॅरे सिंड्रोम या दुर्मिळ आजाराचे रुग्ण आता अकोल्यातही आढळून आले आहेत. अकोल्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात जीबीएस सिंड्रोमच्या ४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील १ रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत असून उपचार घेणाऱ्या चारही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे.

January 20, 2025 8:07 PM January 20, 2025 8:07 PM

views 8

अकोला जिल्ह्यात २३६ ग्रामपंचायतींची क्षयरोग मुक्तीकडे वाटचाल सुरु

अकोला जिल्ह्यात २३६ ग्रामपंचायतींची क्षयरोग मुक्तीकडे वाटचाल सुरु असून क्षयरोगमुक्त ग्रामपंचायतींना पुरस्कार देखील दिला जात आहे. क्षयरूग्णांचे प्रमाण आणि मृत्यू शून्यावर आणण्यासाठी क्षयरोग निर्मूलन मोहिम प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत. प्रौढांच्या बीसीजी लसीकरणासाठी ७५ हजारहून अधिक व्यक्तींनी पूर्वनोंदणी केली असून ३४ टक्के लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयानं दिली. क्षयरूग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची सीवायटीबी तपासणी करून त्यांच्यावर आवश्य...

January 14, 2025 6:52 PM January 14, 2025 6:52 PM

views 11

अकोला इथल्या जिल्हा स्त्री आरोग्य रुग्णालय निर्देशांक मूल्यांकनात प्रथम

आरोग्य विभागाच्या नोव्हेंबर महिन्याच्या निर्देशांक मूल्यांकनात अकोला इथल्या जिल्हा स्त्री आरोग्य रुग्णालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या मूल्यांकनात राज्यभरातील महिला रुग्णालयांची क्रमवारी जाहीर करण्यात आली. यात अकोला इथल्या रुग्णालयाला ९५ गुण मिळाले आहेत.    राज्यातल्या आरोग्यसेवेचा दर्जा सुधारण्यासाठी जिल्हा स्त्री रुग्णालय, जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडून देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेचे मूल्यांकन करण्यासाठी निर्देशांक निश्चित करण्यात आले आहेत....

January 7, 2025 7:09 PM January 7, 2025 7:09 PM

views 14

उज्ज्वल भविष्यासाठी नियोजन आणि सुरक्षितता महत्वाची

उज्ज्वल भविष्यासाठी नियोजन आणि सुरक्षितता महत्वाची असून, महिलांनी  सुरक्षा विमा आणि जीवनज्योती योजनेचा लाभ घ्यावा, असं अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांनी आज सांगितलं.  उमेद, अर्थात ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे अधिकारी आणि आणि बँकर्स साठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. सर्व बँक अधिका-यांनी या दोन्ही योजना येत्या 14 जानेवारीपर्यंत मोहिम स्वरूपात राबवून अधिकाधिक महिलांना त्याचा लाभ द्यावा, तसंच बँकेत नवीन खातं उघडणं, बँक कर्ज प्रस्ताव, व्यक्तिगत कर्ज ...

January 2, 2025 3:38 PM January 2, 2025 3:38 PM

views 506

अकोला जिल्ह्यात नवसाक्षरता कार्यक्रमाअंतर्गत निरक्षर सर्वेक्षण मोहिम

केंद्र सरकारच्या नवसाक्षरता कार्यक्रमाअंतर्गत अकोला जिल्ह्यात निरक्षर सर्वेक्षण मोहिम राबवण्यात येत आहे. शिक्षण विभागाच्या शिक्षक आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात जवळपास १५ हजारांवर निरक्षर आढळून आले आहेत. या निरक्षरांना बाराखडी, पाढे पाठ करण्यासोबतच लिहिण्या-वाचनाचे धडे दिले जाणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधल्या शिफारशीनुसार २०३० पर्यंत १५ वर्षांवरच्या तरुण आणि प्रौढांना १०० टक्के साक्षर करण्यासाठी नवसाक्षरता कार्यक्रम राबवण्यात येत आहे.

December 29, 2024 6:27 PM December 29, 2024 6:27 PM

views 7

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात राज्यस्तरीय ॲग्रोटेक २०२४ कृषी प्रदर्शन सुरु

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंती निमित्त अकोल्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात राज्यस्तरीय ॲग्रोटेक २०२४ कृषी प्रदर्शन सुरु आहे. या प्रदर्शनात महाबीज म्हणजे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची दोन दालनं आहेत. सोयाबीनच्या संशोधित जातींचं वाण, उत्कर्ष हे मूग पिकाचं वाण आणि एमयू चव्वेचाळीस हे उडीद पिकाचं वाण अशी अनेक बियाणं यात मांडली आहेत. शेतकऱ्यांनी महाबीजच्या दालनाला भेट देऊन माहिती घेतली.