October 28, 2024 1:41 PM October 28, 2024 1:41 PM
16
जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांचा गोळीबार
जम्मू-काश्मीरच्या अखनूर भागात भारतीय लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. अखनूर भागातल्या बटाल परिसरात सुरक्षा दलांकडून शोधमोहीम राबवण्यात येत आहे. आकाशवाणी वार्ताहराने दिलेल्या वृत्तानुसार, खूर इथल्या बट्टल भागातल्या असन मंदिराजवळही सशस्त्र दहशतवादी असल्याची माहिती लष्कराला मिळाली आहे. त्यामुळे पोलीस आणि लष्कराच्या तुकड्यांनी या गावाला आणि लगतच्या भागाला वेढा घातला आहे. तसंच, सीमेपलिकडून घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना निष्प्रभ करण्यासाठी मोहीम सुरू आहे. या भागात अधिक फौजफाटा रवाना झाल...