May 9, 2025 3:27 PM

views 27

आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातमीपत्रांच्या वेळेत बदल

आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या काही बातमीपत्रांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार  दुपारी ३चं प्रादेशिक बातमीपत्र ३ वाजून २० मिनिटांनी,  संध्याकाळी  पाच वाजता प्रसारित होणारं बातमीपत्र ५ वाजून २० मिनिटांनी तर रात्री ८ वाजून ५ मिनिटांनी प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र ८ वाजून २० मिनिटांनी प्रसारित होईल.  आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागाचा कार्यक्रम वृत्तविशेष आणि अर्थविशेष संध्याकाळी सव्वासात ऐवजी रात्री साडेआठ वाजता प्रसारित होईल. पुढील आदेश येईपर्यंत हे बदल कायम...

March 31, 2025 8:41 PM

views 16

आकाशवाणी मुंबई प्रदेशिक वृत्त विभागाच्या संचालक सरस्वती कुवळेकर आज सेवानिवृत्त

आकाशवाणी मुंबई, प्रदेशिक वृत्त विभागाच्या संचालक सरस्वती कुवळेकर आज सेवानिवृत्त झाल्या. भारतीय माहिती सेवेतल्या ३४ वर्षात त्यांनी फिल्म प्रभाग, दूरदर्शनचा वृत्त विभाग, आणि आकाशवाणी अशा विविध ठिकाणी काम केलं. 

February 10, 2025 3:30 PM

views 22

आकाशवाणी मुंबईच्या केंद्रीय विक्री विभागातले सहाय्यक संचालक रविश मंगळवेढेकर यांचं निधन

आकाशवाणी मुंबईच्या CSU अर्थात केंद्रीय विक्री विभागातले सहाय्यक संचालक रविश मंगळवेढेकर यांचं आज सकाळी दीर्घ आजारानं निधन झालं. ते ५९ वर्षांचे होते. १९८९ पासून ते आकाशवाणीच्या सेवेत कार्यरत होते. केंद्रीय विक्री विभाग, मुंबई तसंच रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावर विविध पदांवर त्यांनी काम केलं होतं. 

August 10, 2024 3:55 PM

views 15

प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सेहगल यांनी आकाशवाणी मुंबई केंद्राला दिली भेट

प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सेहगल यांनी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान आज आकाशवाणी मुंबई केंद्राला भेट दिली आणि सर्व विभागांच्या कामाचा आढावा घेतला. श्रोत्यांना आवडण्याजोग्या कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करण्याची सूचना त्यांनी आकाशवाणीच्या अधिकाऱ्यांना बैठकीदरम्यान केली. युवा आणि महिला केंद्रित कार्यक्रमांवर अधिक भर घ्यावा, आर्थिक आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने अधिकाधिक कार्यक्रम जाहिरातदारांपर्यंत घेऊन जावेत, असा सल्लाही त्यांनी दिला. वृत्तविभागाच्या प्रमुख सरस्वती कुवळेकर, कार्यक्रम प्रमु...