February 2, 2025 7:27 PM February 2, 2025 7:27 PM

views 11

नवी दिल्लीत आकाशवाणी भवन इथं ‘हर कंठ में भारत’ हा विशेष शास्त्रीय संगीत कार्यक्रम सुरू

सांस्कृतिक मंत्रालयानं आकाशवाणीच्या सहकार्यानं आज नवी दिल्लीत आकाशवाणी भवन इथं 'हर कंठ में भारत' हा विशेष शास्त्रीय संगीत कार्यक्रम सुरू केला. हा कार्यक्रम आजपासून १६ फेब्रुवारीपर्यंत दररोज २१ आकाशवाणी केंद्रांवरून सकाळी साडेनऊ ते १० वाजेपर्यंत थेट प्रसारित केला जाईल. या कार्यक्रमात शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रम होणार आहेत. सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव अरुणिश चावला आणि प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं.   आकाशवाणीच्या महासंचालक डॉ. ...

August 23, 2024 1:45 PM August 23, 2024 1:45 PM

views 14

‘एक पेड मां के नाम’ मोहिमेअंतर्गत आकाशवाणी भवन परिसरात वृक्षारोपण

यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘एक पेड मां के नाम’ ही मोहीम सुरू केली आहे. या उपक्रमांतर्गत देशभरात वृक्षारोपण मोहिमेत लोक उत्साहाने सहभागी होत आहेत. नवी दिल्लीतल्या आकाशवाणी भवन परिसरात आज आकाशवाणीच्या महासंचालक मौसमी चक्रवर्ती आणि अतिरिक्त महासंचालक एल. मधु नाग यांनी वृक्षारोपण केलं. या मोहिमेत आकाशवाणीच्या अन्य अधिकाऱ्यांनाही सहभाग घेतला.