April 26, 2025 1:27 PM April 26, 2025 1:27 PM

views 2

‘विश्वसनीयता’ ही आकाशवाणीची ओळख – डॉ. प्रज्ञा पालीवाल

  ‘आकाशवाणी जनहित राखण्यासाठी तसंच माहिती-शिक्षण आणि मनोरंजन देण्यासाठी वचनबद्ध असून ‘विश्वसनीयता’ ही आकाशवाणीची ओळख आहे’ असं आकाशवाणीच्या महासंचालक डॉ. प्रज्ञा पालीवाल गौर यांनी म्हटलं आहे. रेडिओ आणि श्राव्य कार्यक्रम निर्मिती क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माध्यमांना काल रात्री मुंबईत झालेल्या एका समारंभात गौरवण्यात आलं त्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून गौर बोलत होत्या.    आकाशवाणीनं ‘इंडिया ऑडिओ समीट अँड अवॉर्ड्स - २०२५’ अंतर्गत विविध प्रकारात एकूण सहा पुरस्कार पटकावले आहेत...

March 7, 2025 8:01 PM March 7, 2025 8:01 PM

views 12

आकाशवाणीचा वृत्तविभाग उद्याचा महिला दिन अनोख्या रीतीनं साजरा करणार

आकाशवाणीचा वृत्तविभाग उद्याचा जागतिक महिला दिन अनोख्या रीतीनं साजरा करणार आहे. आज मध्यरात्रीपासून पुढचे २४ तास प्रसारित होणारी सर्व हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र महिला वृत्तनिवेदकच सादर करणार  आहेत. वृत्त विभागाचा उद्या दिवसभराचा कारभारही महिला कर्मचारी वर्गच  सांभाळणार असून महिला दिनानिमित्त उद्या रात्री एका विशेष चर्चासत्राचं  प्रसारण केलं जाणार आहे.

February 2, 2025 7:27 PM February 2, 2025 7:27 PM

views 11

नवी दिल्लीत आकाशवाणी भवन इथं ‘हर कंठ में भारत’ हा विशेष शास्त्रीय संगीत कार्यक्रम सुरू

सांस्कृतिक मंत्रालयानं आकाशवाणीच्या सहकार्यानं आज नवी दिल्लीत आकाशवाणी भवन इथं 'हर कंठ में भारत' हा विशेष शास्त्रीय संगीत कार्यक्रम सुरू केला. हा कार्यक्रम आजपासून १६ फेब्रुवारीपर्यंत दररोज २१ आकाशवाणी केंद्रांवरून सकाळी साडेनऊ ते १० वाजेपर्यंत थेट प्रसारित केला जाईल. या कार्यक्रमात शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रम होणार आहेत. सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव अरुणिश चावला आणि प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं.   आकाशवाणीच्या महासंचालक डॉ. ...

January 10, 2025 7:05 PM January 10, 2025 7:05 PM

views 9

महाकुंभमेळ्यानिमित्त आकाशवाणीची विशेष वाहिनी ‘कुंभवाणी’चं लोकार्पण

उत्तर प्रदेशात होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या आकाशवाणीच्या 'कुंभवाणी' वाहिनीचं लोकार्पण आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते प्रयागराज इथे झालं. महाकुंभ मेळा हा उत्सव जाती धर्मापलिकडे जाऊन एकतेचा संदेश देतो असं ते यावेळी म्हणाले. याच कार्यक्रमात त्यांनी 'कुंभमंगल धून'चं देखील उद्घाटन केलं. प्रसारभारतीचे अध्यक्ष डॉ. नवनीतकुमार सहगल, मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी, दूरदर्शनच्या महासंचालक कांचन प्रसाद, तसंच आकाशवाणीच्या महांचालक डॉ. प्रज्ञा पालिवाल ...

January 9, 2025 8:21 PM January 9, 2025 8:21 PM

views 7

उद्यापासून आकाशवाणीतर्फे ‘कुंभ वाणी’ ही नवीन वृत्तवाहिनी सुरु होणार

महाकुंभमेळ्याला वाहिलेली ‘कुंभ वाणी’ नावाची नवीन वृत्तवाहिनी आकाशवाणीतर्फे सुरु होणार असून तिचं उद्घाटन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उद्या होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यात नव्या ‘कुंभ मंगल धून’ चं  पहिलं सादरीकरण होणार आहे. कुंभ वाणी या वाहिनीवर उद्यापासून २६ फेब्रुवारीपर्यंत महाकुंभमेळ्यात होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचं प्रक्षेपण केलं जाईल. या वाहिनीवर अमृतस्नानाचं थेट प्रसारण देखील ऐकता येईल.    आकाशवाणीच्या १०३ मेगाहर्टझ लहरींवरून , ‘न्यूज ऑन  ए आय आर’ अँप वरून , तसे...

October 24, 2024 1:42 PM October 24, 2024 1:42 PM

views 12

प्रधानमंत्री २७ तारखेला ‘मन की बात’ कार्यक्रमातून नागरिकांशी संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २७ तारखेला मन की बात या आकाशवाणीवरच्या कार्यक्रमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. कार्यक्रमाचा हा ११५ वा भाग आहे. श्रोते येत्या २५ तारखेपर्यंत टोल फ्री क्रमांक, नमो ॲप किंवा मायजीओव्ही ओपन फोरम वरून आपली मतं, सूचना पाठवू शकतात.