August 8, 2024 7:22 PM August 8, 2024 7:22 PM
7
माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ ऑगस्टला जमा होणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ ऑगस्टपर्यंत महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. नाशिकमध्ये दिंडोरी इथं आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेचा प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरणं सुरू आहे. ही योजना राजकीय हेतूने प्रेरित नसून महिलांच्या सबलीकरणासाठी आ...