October 3, 2024 9:13 AM October 3, 2024 9:13 AM

views 12

शेतकऱ्यांच्या विकासामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं योगदान मोठं – उपमुख्यमंत्री अजित पवार

सहकार हा विकासाचा पाया असून शेतकऱ्यांच्या विकासामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचं योगदान मोठं असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बँकेच्या अमृत महोत्सवी वर्ष सांगता कार्यक्रमात बोलताना सांगितलं. साखर कारखान्यांच्या एफआरपीप्रमाणे साखरेची एमएसपीही वाढविण्याचं आश्वासन केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी दिल्यामुळं ऊसाला चांगला दर देणं शक्य होणार असल्याचंही पवार यावेळी म्हणाले.

September 24, 2024 9:24 AM September 24, 2024 9:24 AM

views 19

यंदाचा ऊस गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार

राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; त्यानुसार साखर कारखान्यांनी आणि साखर आयुक्तालयाने कार्यवाही करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. ऊस गाळप आढावा आणि हंगाम नियोजनाबाबत पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्री समितीची बैठक झाली; त्यावेळी ते बोलत होते.

September 21, 2024 4:02 PM September 21, 2024 4:02 PM

views 10

अजित पवार यांच्या पक्षाला घड्याळ्याच्या ऐवजी नवीन चिन्ह द्यावं, अशी शरद पवार यांची सर्वोच्च न्यायालयात मागणी

अजित पवार यांच्या पक्षाला घड्याळ्याच्या ऐवजी नवीन चिन्ह द्यावं, अशी मागणी शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. घड्याळ हे मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्षचिन्ह आहे. पण आता पक्ष कोणाचा हा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावेळी आम्हाला तुतारी हे नवीन चिन्ह दिलं त्याचप्रमाणे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही नवीन चिन्ह द्यावं, अशी मागणी या याचिकेत केल्याचं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. यापूर्वीही अनेकदा ही मागणी केल्याचं त्यांनी सांगितलं.

September 11, 2024 7:01 PM September 11, 2024 7:01 PM

views 13

सोयाबीन, कापसाचा हमीभाव वाढवण्यासाठी तसंच निर्यातीला परवानगी देण्यासाठी केंद्र सरकार अनुकूल

सोयाबीन आणि कापसाचा हमीभाव वाढवण्यासाठी, तसेच निर्यातीला परवानगी देण्यासाठी केंद्र सरकारनं अनुकूलता दर्शवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित शेतकरी प्रतिनिधींच्या बैठकीत ही माहिती दिली.   विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कठोर भूमिका घेतली असून त्याचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसतील, असं त्यांनी सांगितलं. राज्यात ११ हजार ५०० मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीचं उद्दीष्ट असल्यानं कृषीपंपांना दिवसा वीज मिळण्याचा मा...

September 2, 2024 3:55 PM September 2, 2024 3:55 PM

views 10

विधानसभेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मतदानरूपी आशीर्वाद द्यावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्य विधानसभेच्या आगामी निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मतदानरूपी आशीर्वाद द्यावा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेत आज वरूड इथं ते बोलत होते. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत विदर्भातले कापूस, सोयाबीन, संत्री उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा उल्लेख त्यांनी केला. कांदा निर्यातबंदी होऊ नये, सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव मिळावा, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

August 31, 2024 7:26 PM August 31, 2024 7:26 PM

views 15

द्राक्ष बेदाण्याला कृषिमाल म्हणून मान्यता मिळण्यासाठी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

द्राक्षापासून तयार होणाऱ्या बेदाण्याला कृषिमाल म्हणून मान्यता मिळण्यासाठी नाबार्डसह अन्य संबंधित यंत्रणांसोबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत ठरलं. बेदाण्यावरचा पाच टक्के जीएसटी रद्द करण्यासाठी केंद्रीय जीएसटी परिषदेला पत्र लिहिण्यात येईल, द्राक्ष आणि फळबागांना प्लास्टिक आच्छादनासाठी अनुदान मिळावं यासाठी हॉर्टीकल्चर बोर्डाकडे मागणी करण्यात येईल, असे निर्णय या बैठकीत घेण्यात आले.

August 31, 2024 3:12 PM August 31, 2024 3:12 PM

views 6

महिला आणि युवकांनी विधानसभा निवडणुकीत सतर्क राहिले पाहिजे- उपमुख्यमंत्री अजित पवार

विधानसभेची ही निवडणूक आपण अतिशय गांभीर्याने घेतली पाहिजे, महिला आणि युवकांनी या निवडणुकीत सतर्क राहिले पाहिजे अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचं 'राज्यस्तरीय महिला व युवा पदाधिकारी अधिवेशन' मुंबईतल्या महिला आर्थिक विकास मंडळाच्या सभागृहात कालं झालं, त्यावेळी ते बोलत होते.  आपण धर्मनिरपेक्ष विचार सोडलेला नसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिव-शाहू -फुले - आंबेडकरांच्या विचारधारेवरच पुढे चालला असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केले. ...

August 20, 2024 6:48 PM August 20, 2024 6:48 PM

views 7

खंडाळ्यासाठी ५ एमएलडीच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाला गती द्या – उपमुख्यमत्री अजित पवार

लोणावळा नगरपरिषदेच्या विविध प्रलंबित प्रकरणांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आढावा घेतला. लोणावळा, खंडाळा शहरांच्या भविष्यातील लोकसंख्येचा, पर्यटकांचा विचार करून खंडाळ्यासाठी ५ एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प आणि लोणावळा शहरासाठी नऊ ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तातडीनं उभारण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आजच्या बैठकीत दिले. भांगरवाडी-नांगरगाव रेल्वे उड्डाणपुलाचे उर्वरित काम नगरपरिषद आणि रेल्वे प्राधिकरणाकडून तातडीनं करून घ्यावे, त्यातील भूसं...

August 15, 2024 6:53 PM August 15, 2024 6:53 PM

views 14

बारामती विधानसभा मतदारसंघातून स्वतः निवडणूक न लढवण्याचे अजित पवार यांचे संकेत

बारामतीतून विधानसभा निवडणूक आपण सात-आठ वेळा लढली असून आता मला ती लढवण्यात स्वारस्य नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार आज म्हणाले. आपला मुलगा जय पवार याला उमेदवारी द्यावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळे जय याच्या उमेदवारीविषयी पक्षाचं संसदीय मंडळ निर्णय घेईल, असं पुण्यात वार्ताहरांशी बोलताना त्यांनी सांगितलं. 

August 9, 2024 7:16 PM August 9, 2024 7:16 PM

views 13

कांदा निर्यात बंदीचा निर्णय चुकीचा होता आणि त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसला – उपमुख्यमंत्री अजित पवार

कांदा निर्यातीवर बंदी घातल्यामुळे शेतकरी नाराज झाले, याचा फटका महायुतीला लोकसभा निवडणुकीत बसला. त्यामुळे कांदा निर्यातीवर बंदी लादण्याचा सरकारचा निर्णय चुकीचा होता, अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काढलेल्या जनसन्मान यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव इथं आयोजित लाडकी बहीण संवाद मेळाव्यात ते बोलत होते. सरकारच्या योजनांचा लाभ घेऊन महिला सक्षम व्हाव्यात हा सरकारचा प्रयत्न असल्याचं अजित पवा...