December 19, 2024 3:42 PM December 19, 2024 3:42 PM

views 13

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेलं २० टक्के शुल्क रद्द करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेलं २० टक्के शुल्क तातडीनं रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून केली आहे. नाशिकसह राज्यातल्या शेतकऱ्यांना त्यांचा लाल कांदा श्रीलंकेसह परदेशांमध्ये निर्यात करता यावा तसंच कांद्याला खर्चावर आधारीत चांगला दर मिळावा यासाठी कांद्यावरील २० टक्के निर्यातशुल्क रद्द करणं आवश्यक असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पत्रात म्हटलं आहे. 

November 30, 2024 7:20 PM November 30, 2024 7:20 PM

views 13

मुख्यमंत्री भाजपचा, उपमुख्यमंत्री शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे – अजित पवार

महायुती सरकारचा शपविधी ५ डिसेंबरला होणार असून मुख्यमंत्री भाजपचा होईल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज पुण्यात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री असतील असं पवार म्हणाले. विरोधकांचा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे त्याचं खापर मतदान यंत्रावर फोडलं जात आहे, अशी टीका करत मतदान यंत्राबद्दल तक्रार करणं योग्य नाही असं पवार म्हणाले. मतदान यंत्रात घोटाळा झाला असेल तर तो सिद्ध करून दाखवला पाहिजे असंही पवार म्हणाले. 

November 24, 2024 2:49 PM November 24, 2024 2:49 PM

views 12

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी अजित पवार यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज मुंबईत पार पडली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अजित पवारांसह खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, आमदार दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांच्यासह इतर नेते या बैठकीला उपस्थित होते.

November 15, 2024 6:54 PM November 15, 2024 6:54 PM

views 13

अकोले तालुक्याचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास होईल, अजित पवारांचं आश्वासन

अहिल्यानगर आणि नाशिक या दोन जिल्ह्यातल्या नागरिकांच्या सिंचनाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय निळवंडे प्रकल्पातून झाली आहे. आगामी काळात अकोले तालुक्याचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास होईल. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक लवकरच उभारण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. अहिल्यानगरमध्ये प्रचार सभेत ते बोलत होते.

November 13, 2024 7:12 PM November 13, 2024 7:12 PM

views 13

अजित पवार यांच्या पक्षाने निवडणुकीसाठी शरद पवारांच्या नावावर अवलंबून राहू नये – सर्वोच्च न्यायालय

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणूक जाहिरातीत संस्थापक शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख वारंवार का केला जातो अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार यांच्या पक्षाकडे केली आहे. अजित पवार यांच्या पक्षाने निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या नावावर अवलंबून राहू नये असा सल्लाही न्यायालयानं दिला.

November 13, 2024 6:49 PM November 13, 2024 6:49 PM

views 14

बीडमध्ये पाणीप्रश्न तडीस नेऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार

महायुतीची सत्ता आल्यावर बीड मध्ये एमआयडीसी उभा करू तसंच विमान सेवा सुरू करू असं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिलं. ते आज बीड इथं प्रचारसभेत बोलत होते. बीड मतदारसंघात पाण्याचा प्रश्न तडीस नेऊ, असं आश्वसन यावेळी पवार यांनी दिलं. 

November 12, 2024 7:44 PM November 12, 2024 7:44 PM

views 14

एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची रवी राणा यांना ताकीद

अमरावती जिल्ह्यातल्या बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी महायुतीची शिस्त पाळायला हवी, महायुतीविरुद्ध काम करणं चालणार नाही, अशी ताकीद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. अमरावतीत भाजपाचे उमेदवार जिंकायला हवेत, बाकीचे पराभूत झाले तरी चालतील, अशा आशयाचं विधान रवी राणा यांनी एका सभेत केलं होतं. त्यासंदर्भात ते बोलत होते.    रवी राणा विनाशकाले विपरित बुद्धी झाल्यासारखं वागत आहेत अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. रवी राणा यांच्या भाषेमुळेच त्यांच्या ...

November 7, 2024 3:55 PM November 7, 2024 3:55 PM

views 18

शरद पवारांच्या टीका राष्ट्रवादी काँग्रेस खपवून घेणार नाही- अजित पवार

शरद पवारांवर खालच्या पातळीवरची वैयक्तिक टीका राष्ट्रवादी काँग्रेस खपवून घेणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाजमाध्यमावर दिला आहे. आमदार सदाभाऊ खोत यांच्या टीप्पणीसंदर्भात हे वक्तव्य चुकीचं आणि अमान्य आहे अशी प्रतिक्रिया देत अजित पवार यांनी त्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

November 6, 2024 7:00 PM November 6, 2024 7:00 PM

views 15

राष्ट्रवादी काँग्रेसचं ‘घड्याळ’ हे निवडणूक चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याचं स्पष्ट करणार – अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ हे निवडणूक चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याचं स्पष्ट करणारं जाहीर प्रकटन ३६ तासांच्या आत मराठीसह इतर भाषांमधल्या वृत्तपत्रांमध्ये ठळक पद्धतीनं छापू, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या तोंडी सूचनेनंतर अजित पवार यांचे वकील बलबीर सिंह यांनी पवारांच्या वतीनं ही हमी दिली. विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह वापरण्यापासून रोखण्याची मागणी करणारी याचिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटानं केली होत...

October 9, 2024 6:58 PM October 9, 2024 6:58 PM

views 13

राज्यात कोणतीही योजना बंद होणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्याची आर्थिक परिस्थिती मजबूत असल्याने लाडकी बहीणसह कोणतीही योजना बंद करण्यात येणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. पिंपरी-चिंचवड शहरातल्या विकासकामांचे भूमीपूजन,  उद्घाटन आणि लोकार्पण त्यांनी केलं, त्यावेळी ते बोलत होते. राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याचं सांगून  देशात सर्वात जास्त वस्तू आणि सेवा कर महाराष्ट्रातून मिळतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.