January 17, 2026 6:26 PM
17
महानगरपालिका निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं भाजपाचं अभिनंदन
महानगरपालिका निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपाचं अभिनंदन केलं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधे पक्षाचा पराभव झाल्यानंतर ते आज पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. निवडणूक निकालाचं पक्षाचे नेते एकत्र बसून विश्लेषण करतील असं पवार म्हणाले. प्रत्येक पक्ष मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतो, भाजपाने यात लक्षणीय यश मिळवलं आहे, असं पवार म्हणाले. त्याआधी बारामती इथं उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. त्यानंतर शऱ...