January 7, 2025 6:50 PM January 7, 2025 6:50 PM

views 10

भारत आणि मलेशिया देशांमधल्या सुरक्षा सहकार्य बळकट करण्यासाठी संमती

भारत आणि मलेशिया ने दहशतवादाचा आणि मूलतत्त्ववादाचा सामना  करण्यासाठी तसंच सायबर सुरक्षा, संरक्षणविषयक उद्योगांच्या आणि सागरी सुरक्षेच्या विषयात सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी संमती दर्शवली आहे. नवी दिल्लीत देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि मलेशियाच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे महासंचालक राजा दातो नुशिरवान बिन झैनल अबिदीन यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या दोन्ही देशांमधल्या पहिल्या सुरक्षा संवादात महत्वाच्या तसंच दुर्मिळ खनिजांच्या बाबतीतही सहकार्याला दुजोरा दर्शवला आहे.

August 29, 2024 7:48 PM August 29, 2024 7:48 PM

views 13

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल श्रीलंका दौऱ्यासाठी कोलंबो इथं पोहचले

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल दोन दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यासाठी  कोलंबो इथं पोहोचले आहेत. भारत श्रीलंका आम मालदीव्ज यांच्या संयुक्त प्रयत्नांतून सुरु झालेल्या कोलंबो सुरक्षा परिषदेच्या तयारीचा ते आढावा घेतील.    दहशतवादाचा सामना करण्यासाठी, पोलीस, कायदा अंमलबजावणी आणि सायबर सुरक्षा या क्षेत्रात क्षमतावाढ या विषयावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरची सहावी बैठक गेल्या डिसेंबरमधे मॉरिशस मधे झाली होती.