May 7, 2025 1:54 PM May 7, 2025 1:54 PM
14
देशातल्या अनेक विमानतळांवरची व्यावसायिक वाहतूक सेवा बंद
भारतीय लष्करी दलांच्या या मोहिमेनंतर देशाच्या उत्तर भागातल्या अनेक विमानतळांवरची व्यावसायिक वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आली आहे. एअर इंडियानं जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, बिकानेर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड, राजकोट इथली विमान वाहतूक येत्या १० तारखेपर्यंत रद्द केली आहे. हवाई वाहतूक अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेतल्याचं विमान कंपन्यांनी सांगितलं. या काळातल्या वैध तिकिटांसाठी एक वेळच्या बदलासाठी शुल्क लावलं जाणार नाही किंवा संपूर्ण परतावा मिळू शकेल. प्रवाशांनी आधी आपल्या विमान प्रवासाब...