December 25, 2025 2:48 PM December 25, 2025 2:48 PM

views 20

नवी मुंबई विमानतळाचं परिचालन सुरु

 नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून व्यावसायिक उड्डाणं सुरू झाली. आज सकाळी आठ वाजता बेंगळुरूहून आलेलं पहिलं विमान धावपट्टीवर उतरलं. या विमानाला हवेत पाण्याचे फवारे सोडून सलामी देण्यात आली. तर सकाळी पावणे नऊ वाजता या विमानतळावरून हैदराबादच्या दिशेने पहिलं विमान आकाशात झेपावलं. सध्या या विमानतळावरून देशभरातल्या नऊ विमानतळांवर विमान प्रवास सुरू करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात सकाळी आठ ते रात्री आठ अशी बारा तासापुरती विमानसेवा सुरू राहील.   

July 12, 2025 7:43 PM July 12, 2025 7:43 PM

views 11

नवी मुंबई विमानतळाचं काम सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम ३० सप्टेंबरपूर्वी पूर्ण करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांनी या विमानतळाची पाहणी केली आणि आणि धावपट्टीपासून ते टर्मिनल इमारतीपर्यंतच्या प्रगतीची माहिती घेतली. त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. हा देशातला सगळ्यात अद्ययावत प्रकल्प ठरणार असून या विमानतळाचं ९४ टक्के काम पूर्ण झालं आहे. धावपट्टी आणि टर्मिनल इमारतीचं कामही पूर्ण झालं आहे. आता आतल्या भागाचं काम सुरू आहे, असं त्यांनी सांगितलं.  &nbs...

February 15, 2025 3:39 PM February 15, 2025 3:39 PM

views 46

नांदेड, लातूर, यवतमाळ, सोलापूर आणि अमरावती विमानतळ लवकरच एमआयडीसी कडे

राज्यातली विमान सेवा आणखी तत्पर आणि सुकर करण्याच्या उद्देशानं नांदेड, लातूर, यवतमाळ, सोलापूर आणि अमरावती विमानतळ लवकरच शासन खाजगी कंपनीकडून एमआयडीसीकडे हस्तांतरित करणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. नांदेड आणि परभणीच्या दौऱ्यावर आले असताना सामंत यांनी विविध योजनांचा आढावा घेतला आणि बातमीदारांशी संवाद साधला.

December 13, 2024 8:36 PM December 13, 2024 8:36 PM

views 17

विमानतळांवर लवकरच उडाण यात्री कॅफे सुरू होणार

उडाण योजनेअंतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सरकारतर्फे लवकरच विमानतळांवर उडाण यात्री कॅफे सुरू करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री के.आर. राममोहन नायडू यांनी दिली. या कॅफेमध्ये प्रवाशांना परवडणाऱ्या किमतीत अन्न पदार्थांची विक्री करण्यात येईल. कोलकता विमानतळावर प्रायोगिक तत्त्वावर पहिला कॅफे सुरू करण्यात येईल, त्यानंतर देशभरातील अन्य विमानतळांवर सुरू केला जाईल, असंही नायडू यांनी या वेळी सांगितलं. 

October 11, 2024 3:04 PM October 11, 2024 3:04 PM

views 10

नवी मुंबई विमानतळावर ४ टर्मिनलची उभारणी होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी मुंबई विमानतळावर ४ टर्मिनलची उभारणी होणार असून या विमानतळावरून वर्षाला ९ कोटी लोक प्रवास करतील, तसंच २६ लाख टन कार्गो वाहतूक होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाई पट्टीवर भारतीय हवाई दलाच्या C-295 विमानाचं यशस्वी चाचणी लँडिंग झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.   भारतीय विमानतळ प्राधिकरणाने विमानतळावरील इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीमच्या चाचण्या पूर्ण केल्यानंतर आज धावपट्टीची चाचणी करण्यात आली. यावेळी केंद्रीय वि...

July 20, 2024 1:51 PM July 20, 2024 1:51 PM

views 17

देशातली विमानतळांवरची एअरलाईन कार्यप्रणाली पूर्ववत

मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअरच्या प्रणालीत काल झालेला तांत्रिक बिघाड हळूहळू सोडवण्यात येत आहे, मात्र, सर्व यंत्रणा सुरळीत होण्यास आणखी काही वेळ लागेल, असं मायक्रोसॉफ्टची सहयोगी कंपनी क्राउडस्ट्राइकच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअरच्या प्रणालीत काल तांत्रिक बिघाड झाला आणि जगभरातले व्यवहार ठप्प झाले. या तांत्रिक बिघाडाचा अर्थात आऊटेजचा जगभरातल्या कोट्यवधी वापरकर्त्यांना तसंच बँकिंग सेवा, रुग्णालयं आणि विमान वाहतूक यंत्रणेला सर्वात जास्त फटका बसला. देशातल्याही अनेक विम...