January 23, 2025 8:32 PM January 23, 2025 8:32 PM

views 4

भारताच्या हवाई प्रवासी वाहतुकीत ६.१२ टक्क्याची वाढ

भारताच्या देशांतर्गत हवाई प्रवासी वाहतुकीत गेल्या वर्षभरात ६ पूर्णांक १२ शतांश टक्क्याची वाढ झाली. गेल्या वर्षी १६ कोटी १३ लाख प्रवाशांनी हवाई मार्गांचा वापर केला. गेल्या वर्षात देशांतर्गत उड्डाणं रद्द झाल्याचं प्रमाण १ पूर्णांक ७ शतांश टक्के इतकं होतं. त्यामुळे ६७ हजार ६२२ प्रवाशांना फटका बसला, अशी माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने दिली आहे.

January 1, 2025 8:15 PM January 1, 2025 8:15 PM

views 2

उड्डाणाला होणाऱ्या विलंबाचं प्रमाण कमी करणं महत्वाचं – मंत्री किन्जरप्पू राम मोहन नायडू

खराब हवामानाच्या परिस्थितीत हवाई वाहतूक सुरळीत ठेवतानाच उड्डाणाला होणाऱ्या विलंबाचं प्रमाण कमी करणं महत्वाचं आहे असं नागरी हवाई वाहतूक मंत्री किन्जरप्पू राम मोहन नायडू यांना म्हटलं आहे. दाट धुक्यामुळे हवाई उड्डाणांना होणारा विलंब किवा उड्डाणे रद्द होणे या परिस्थितीला तोंड देण्याची पूर्वतयारी करण्याबाबत गेले दोन महिने नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून संबधितांशी संवाद साधला जात आहे. खराब हवामानामुळे विमान उड्डाणाच्या वेळांमध्ये होणाऱ्या बदलांबाबत प्रवाशांना वेळीच योग्य कल्पना देणे तसंच अशा वेळी विव...