October 26, 2025 12:53 PM October 26, 2025 12:53 PM
14
राजधानी दिल्ली मधली हवेची गुणवत्ता खालावली
राजधानी दिल्ली मधली हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली असून, आज सकाळी एक्यूआय, म्हणजेच हवेचा गुणवत्ता निर्देशांक 322 इतका नोंदवला गेला. शहराच्या अनेक भागांमध्ये तो ३५० च्या पुढे गेल्याचं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं म्हटलं आहे. वातावरणात धुरकं भरल्यामुळे आज सकाळी राजधानीमध्ये ट्रकवर बसवलेल्या स्प्रिंकलर मधून पाण्याची फवारणी करण्यात आली.