November 20, 2025 6:49 PM November 20, 2025 6:49 PM

views 27

मुंबईत वायू प्रदूषण नियंत्रणासाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे निर्देश

मुंबईत वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिकेनं जारी केलेल्या २८ मार्गदर्शक तत्त्वांचं  उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त शहर डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. विविध उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी महानगरपालिकेडून प्रत्येक प्रशासकीय विभाग स्तरावर भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. ही सर्व मार्गदर्शक तत्त्वे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. नागरिकांनी वायू प्रदूषणाला कारणीभूत ठरतील अशी कृत्यं टाळावीत आणि...

November 17, 2024 11:03 AM November 17, 2024 11:03 AM

views 53

नवी दिल्लीतील राष्ट्रीय राजधानी प्रदेशातील हवेची गुणवत्ता अजूनही गंभीर श्रेणीत

हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोग आणि संबंधित अधिकार्‍यानी हवेची गुणवत्ता निकृष्ट असलेल्या नवी दिल्लीतील राष्ट्रीय राजधानी प्रदेशातील विभागांसाठी श्रेणी निर्धारित कृती आराखडा तयार केला आहे. नवी दिल्ली इथं काल झालेल्या बैठकीमध्ये यासंबंधी काही कडक निर्णय घेण्यात आले. येत्या आठवडाभरात नागरिकांकडून आलेल्या तक्रारींचं निवारण तातडीनं करण्याच्या सूचना हवा गुणवत्ता आयोगानं संबंधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित संस्थांकडून सर्व नियमांचं काटेकोरपणे प...