November 29, 2025 6:06 PM November 29, 2025 6:06 PM

views 9

मुंबईतल्या वायू प्रदूषणाचा सामना करण्यात राज्य सरकार अपयशी – वर्षा गायकवाड

मुंबईतल्या वायू प्रदूषणाच्या वाढत्या आव्हानाचा सामना करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केली  आहे. त्या मुंबईत हवेच्या गुणवत्ता विषयावर काँग्रेसकडून आयोजित बैठकीत आज बोलत होत्या. दूषित हवेमुळे दरवर्षी मुंबईतले ५ हजार शंभर लोक आपले प्राण गमावतात असं गायकवाड यांनी हावर्ड विद्यापीठाच्या अभ्यासाचा हवाला देऊन सांगितलं.  बेसुमार बांधकाम, वृक्षतोड, पर्यावरणीय नियमांचं उल्लंघन यामुळे वायू प्रदूषणात भर पडत आहे. मात्र महायुती सरकार केवळ कंत्राटदारांच्या फायद्याची ध...

October 15, 2025 7:18 PM October 15, 2025 7:18 PM

views 28

दिल्ली आणि मुंबईच्या हवेत प्रदूषणकारी वायूंच्या पातळीत वाढ

दिल्ली आणि मुंबईच्या हवेतली कार्बन डायॉक्साईड आणि मिथेन या प्रदूषणकारी वायूंची पातळी गेले अनेक वर्षं वाढत असल्याचं आयआयटी मुंबईच्या संशोधकांच्या अहवालात दिसून आलं आहे.    दिल्लीच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक काल २११ पर्यंत अर्थात ‘वाईट’ या श्रेणीत पोचला असून येत्या शुक्रवारपर्यंत तो ३४६ पर्यंत म्हणजेच ‘अतिशय वाईट’ या श्रेणीत पोचण्याची शक्यता आहे. मुंबईच्या हवेचा सरासरी गुणवत्ता निर्देशांक पावसाळा थांबल्यानंतरच्या काळात अधिक खराब झाला असून तो गेल्या आठवड्यात १५३ पर्यंत पोचला असल्याचं या अहवा...

January 1, 2025 8:01 PM January 1, 2025 8:01 PM

views 9

वायू प्रदूषणाचं प्रमाण नियंत्रणात नाही तोपर्यंत बांधकाम प्रकल्‍पांवरचे निर्बंध कायम

मुंबई शहरातलं वायू प्रदूषणाचं प्रमाण  पूर्ण नियंत्रणात येत नाही तोपर्यंत  ई विभागातल्या बांधकाम प्रकल्‍पांवरचे निर्बंध कायम ठेवण्यात येणार  असल्याचं महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागानं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे. भायखळा परिसरात सुरु असलेल्या बांधकाम प्रकल्‍पांची  पाहणी केल्यानंतर महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी हे निर्देश दिल्याचं पत्रकात म्हटलं आहे. 

December 30, 2024 8:18 PM December 30, 2024 8:18 PM

views 6

हवेची गुणवत्ता घसरून प्रदुषणात वाढ – मुंबई महानगरपालिका

हिवाळ्यातलं उतरलेलं तापमान, कमी झालेला वाऱ्याचा वेग यामुळे नैसर्गिक वायुवीजन कमी होऊन, हवेची गुणवत्ता घसरल्याचं तसंच प्रदुषणातही वाढ झाल्याचं बृहन्मुंबई महानगर पालिकेनं म्हटलं आहे. यासोबतच ऐन थंडीच्या काळातल्या ढगाळ हवामान, वाहनांचं उत्सर्जन आणि बांधकामांच्या ठिकाणी निर्माण होणारी धूळ यामुळेही वायू प्रदूषणात वाढ झाली असल्याचं पालिकेनं म्हटलं आहे.    या प्रदुषणात घट साध्य करण्यासाठी तातडीनं उपाययोजना सुरु केल्या आहेत, त्याअंतर्गत बांधकामांमुळे होणारं प्रदूषण कमी करण्यासाठी २८ मुद्यांची सविस्...