June 20, 2025 2:06 PM

views 16

तांत्रिक आणि देखभालीच्या कारणामुळे अनेक आंतरराष्ट्रीय विमानसेवा रद्द करण्याचा एअर इंडियाचा निर्णय

एअर इंडियानं तांत्रिक आणि देखभालीच्या कारणामुळे अनेक आंतरराष्ट्रीय विमानसेवा रद्द करायचा निर्णय घेतला आहे. विमानाच्या उड्डाणापूर्वी अतिरिक्त सुरक्षा खबरदारी घेणं, तसंच मध्य पूर्वेत हवाई सीमा बंद झाल्यामुळे वाढलेल्या फेऱ्या लक्षात घेऊन बोइंग ७८७ आणि ७७७ या विमानांच्या फेऱ्या कमी करायचा निर्णय घेतल्याचं एअर इंडियान जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमृतसर ते लंडन आणि गोवा ते लंडन विमानसेवा १५ जुलैपर्यंत, तर दिल्ली ते नैरोबी विमानसेवा ३० जूनपर्यंत बंद राहणार असल्याची माहितीही कंपनीनं दिली.    

June 13, 2025 8:42 AM

views 41

विमान दुर्घटना अन्वेषण विभागाकडून अहमदाबाद विमान दुर्घटनेची चौकशी सुरू

गुजरातमध्ये अहमदाबाद इथं काल दुपारी एअर इंडियाचं एआय-171 हे प्रवासी विमान रहिवासी भागात कोसळलं; विमान दुर्घटना अन्वेषण विभागानं या दुर्घटनेची चौकशी सुरू केली आहे. आंतरराष्ट्रीय नागरी विमान संघटनेनं ठरवलेल्या प्रक्रियेनुसार ही चौकशी केली जाईल, असं नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितलं. या विमानात प्रवासी आणि कर्मचारी मिळून 242 जण होते. त्यामध्ये 169 भारतीय नागरिक, 53 ब्रिटिश नागरिक, पोर्तुगालचे 7 नागरिक आणि कॅनडाच्या एका नागरिकाचा समावेश होता. या अपघातात विमानंतल्या 241 लोकांचा ...

May 13, 2025 1:16 PM

views 19

एअर इंडिया आणि इंडिगोच्या काही विमानसेवा सुरक्षेच्या कारणास्तव रद्द

प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एअर इंडिया आणि इंडिगो या विमान कंपन्यांनी जम्मू, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड आणि राजकोट इथली विमान उड्डाण सेवा आज रद्द केल्या आहेत. दिल्ली विमानतळावरून नियमित उड्डाणं होत आहेत. मात्र, बदलत्या हवाई परिस्थितीमुळे आणि नागरी विमान वाहतूक सुरक्षा विभागाने अनिवार्य केलेल्या वाढीव सुरक्षा उपायांमुळे, काही उड्डाण वेळापत्रकांवर परिणाम होऊ शकतो, असं या विमान कंपन्यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. वेळापत्रकांवरच्या परिणामामुळे चेक-इन प्रक्...

May 4, 2025 6:27 PM

views 29

भारतातून इस्राएलमध्ये तेल अवीव विमानतळावर जाणारी विमानसेवा स्थगित

भारतातून इस्राएलमध्ये तेल अवीव विमानतळावर जाणारी विमानसेवा एअर इंडियाने येत्या ६ मे पर्यंत स्थगित केली आहे. तेल अवीव च्या आसपास होत असलेल्या क्षेपणास्त्र हल्लयांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं एअर इंडियाने समाजमाध्यमावर पोस्ट केलं आहे. ज्या प्रवाशांनी या दरम्यानच्या तारखांसाठी तिकीटे काढली असतील त्यांना प्रवासाच्या तारखेत विनाशुल्क बदल करून  मिळेल अथवा तिकीट रद्द केल्यास पूर्ण रक्कम परत मिळेल असं एअर इंडियाने म्हटलं आहे.

October 14, 2024 3:17 PM

views 15

एअर इंडियाचं विमान बॉम्बनं उडवण्याची धमकी

मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाचं विमान बॉम्बनं उडवण्याची धमकी मिळाल्यानंतर आज सकाळी दिल्ली विमानतळावर ते तातडीनं उतरवण्यात आलं. विमानाची तपासणी केली असता कोणतीही आक्षेपार्ह वस्तू मिळाली नाही. विमानातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. मुंबईहून मस्कतला जाणाऱ्या इंडिगो विमानही बॉम्बनं उडवण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर या विमानाची कसून तपासणी केली जात आहे. इंडिगोच्या मुंबईहून जेद्दाला जाणाऱ्या विमानातही बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली.   दरम्यान, मुंबई हावडा गाडीही टाईम बॉम्बनं उडवण्याची धमक...

August 3, 2024 9:50 AM

views 15

एअर इंडियाची इस्रायलची राजधानी तेल अवीवला जाणारी सर्व विमान उड्डाणं रद्द

मध्य पूर्व आशियातली तणावपूर्ण स्थिती लक्षात घेत एअर इंडियानं इस्रायलची राजधानी तेल अवीवला जाणारी आणि तिथून देशात येणारी सर्व विमान उड्डाणं ८ ऑगस्टपर्यंत रद्द केली आहेत. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या कारणावरून ही उड्डाणं रद्द केल्याचं एअर इंडियानं म्हटलं आहे. उड्डाणं रहित झाल्यानं ज्या प्रवाश्यांची तिकिटं रद्द झाली आहेत त्यांना तिकिटाचे पैसे परत घेण्याचा किंवा प्रवासाची तारीख पुढे ढकलण्याचा पर्याय देण्यात आल्याचं एअर इंडियानं जाहीर केलं आहे.