November 13, 2025 8:13 PM November 13, 2025 8:13 PM

views 15

दिल्लीतल्या एम्समध्ये महामारी तयारी तसंच आपत्कालीन प्रतिसाद केंद्राचा WHO नं केला प्रारंभ

जागतिक आरोग्य संघटनेनं नवी दिल्लीतल्या एम्समध्ये आज महामारी तयारी तसंच आपत्कालीन प्रतिसाद केंद्राचा प्रारंभ केला.  महामारी किंवा साथीचे आजार उद्भवल्यास तातडीनं सार्वजनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी तपासणी आणि संशोधन करता यावं म्हणून अनेक देशात अशी केंद्र उभारण्यात आल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे. हे केंद्र महामारी नसलेल्या काळातही कार्यरत राहील जेणेकरून ही प्रणाली संकटकाळात प्रतिसाद देण्यासाठी सज्ज राहील, असं एम्स चे संचालक डॉ एम श्रीनिवास यांनी सांगितलं.

April 18, 2025 10:28 AM April 18, 2025 10:28 AM

views 19

सर्वोत्तम रुग्णालयांच्या क्रमवारीत नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालय ९७ व्या स्थानी

जगातील सर्वोत्तम रुग्णालयांच्या 2024 वर्षाच्या क्रमवारीत नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्स ने जागतिक क्रमवारीत, सर्वोत्तम रुग्णालय म्हणून 97वं स्थान पटकावलं आहे. न्यूजवीक आणि स्टेटिस्टा या संस्थांनी जगभरातील 2 हजार 400 रुग्णालयांच्या केलेल्या सर्वेक्षणानंतर ही क्रमवारी जाहीर केली आहे. रुग्ण समाधान, रोग निदान, स्वछता मानके आणि आरोग्यसेवेतील व्यावसाईकांच्या शिफारशी यानुसार ही क्रमवारी देण्यात आली आहे.

March 22, 2025 10:06 AM March 22, 2025 10:06 AM

views 13

एम्सचा 49वा दीक्षांत समारोह सोहळा राष्ट्रपतींच्या हस्ते पार पडला

मानसिक आरोग्याशी निगडीत जागरुकता मोहीम राबवून नागरिकांना या सुप्त आजाराची जाणीव करून देण्याचे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी काल दिल्लीत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजेच एम्सच्या अधिकारी, प्राध्यापकांना केलं.   भावनिक आरोग्य हे एक महत्त्वाचे आव्हान झाल्याचे त्या म्हणाल्या. एम्सचा 49 वा दीक्षांत समारोह सोहळा राष्ट्रपतींच्या हस्ते काल पार पडला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी केंद्रीय आरोग्य कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी एम्सने कृत्रिम बुद्धिमत्ता संचलित रोगनिदान आणि यंत्रमान...

March 11, 2025 9:53 AM March 11, 2025 9:53 AM

views 12

राष्ट्रपती आज पंजाबमधील एम्स च्या दीक्षांत समारंभांना उपस्थित राहणार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज पंजाबमधील भटिंडा इथं सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ पंजाब आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) च्या दीक्षांत समारंभांना उपस्थित राहणार आहेत.   संध्याकाळी पंजाब सरकारनं त्यांच्या सन्मानार्थ मोहाली इथं आयोजित केलेल्या एका नागरी स्वागत समारंभात सहभागी होतील. उद्या त्या चंदीगड इथं पंजाब विद्यापीठाच्या 72 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत. नव्या काळाच्या गरजेनुसार शिक्षण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल घडवण्यासाठी नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलब...

September 29, 2024 2:56 PM September 29, 2024 2:56 PM

views 11

नवी दिल्लीत एम्समध्ये मौखिक आरोग्याबाबत कार्यशाळेचं आयोजन

नवी दिल्लीत एम्समध्ये आज मौखिक आरोग्याबाबत कार्यशाळा घेण्यात आली. देशातल्या मौखिक आरोग्यासाठी आवश्यक सोयीसुविधा सुधारणं हा या कार्यशाळेचा मुख्य हेतू होता. निती आयोगाचे सदस्य डॉ. विनोद कुमार पॉल यांनी राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम २.० तयार करण्याचं आवाहन यावेळी केलं. मौखिक आरोग्यासाठी आयुर्वेदाचा वापर करावा आणि बालकांच्या मौखिक आरोग्याविषयी जनजागृती करावी असंही पॉल यांनी सांगितलं. 

September 10, 2024 1:07 PM September 10, 2024 1:07 PM

views 2

एम्स्ने नवी दिल्ली इथं तंबाखू निर्बंध केंद्राचं केलं उदघाटन

एम्स् अर्थात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेनं  आज नवी दिल्ली इथं TCC म्हणजेच  ‘तंबाखू निर्बंध केंद्राचं’ उदघाटन केलं. TCC हा NDDTC अर्थात राष्ट्रीय औषध अवलंबित्व उपचार केंद्र आणि एम्स् चा पल्मोनरी, क्रिटिकल आणि स्लिप मेडिसिन विभाग यांच्यातल्या समन्वयातून उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून, रुग्णांना तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या घातक परिणामांबाबत वैद्यकीय तज्ञांकडून समुपदेशन केलं जाणार आहे, असं विभागाचे प्राध्यापक आणि प्रमुख डॉ. अनंत मोहन यांनी आकाशवाणीशी...

August 21, 2024 7:45 PM August 21, 2024 7:45 PM

views 2

निवासी डॉक्टरांनी रुग्णांच्या हितासाठी पुन्हा कामावर रुजू होण्याचं एम्सचं आवाहन

निवासी डॉक्टरांनी रुग्णांच्या हितासाठी पुन्हा कामावर रुजू होण्याचं आवाहन एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान परिषदेनं एका पत्रकाद्वारे केलं आहे. एम्सनं आरोग्यसेवा व्यावसायिकांच्या कोणत्याही तत्काळ समस्यांचं निराकरण करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये इतर चार सदस्यांसह रुग्णालयाचे अधिष्ठातांचा अध्यक्ष म्हणून समावेश करण्यात आला आहे, असंही या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.  संस्थेनं आरोग्य सेवा कर्मचारी, रुग्ण आणि अभ्यागतांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात अंतर्गत सुरक्षा ऑडिटसाठी स्वतंत्...

August 20, 2024 7:23 PM August 20, 2024 7:23 PM

views 15

मंकीपॉक्स विषाणूच्या संशयित रुग्णांवर उपचार करण्याविषयी एम्सकडून मार्गदर्शक सूचना जारी

मंकीपॉक्स विषाणूच्या संशयित रुग्णांवर उपचार करण्याविषयी एम्स अर्थात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ताप, पुरळ असलेल्या किंवा मंकीपॉक्स असणाऱ्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना तपासणीसाठी निवडलं जाईल, असं एम्सनं म्हटलं आहे. संशयित रुग्णाला तत्काळ विलगीकरणात ठेवण्यात यावं असंही एम्सनं मार्गदर्शक सूचनेत म्हटलं आहे.  एम्सने मंकीपॉक्स रुग्णांसाठी पाच खाटा आरक्षित ठेवल्या असून या रुग्णांवर सफदरजंग रुग्णालयात उपचार करण्यात येतील.  जागतिक आरोग्य संघट...