September 19, 2025 6:56 PM September 19, 2025 6:56 PM
12
विविध स्टील कंपन्यांबरोबर राज्य सरकारचे ८१ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार
मुंबईत आज आयफा स्टील महाकुंभ या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनानं विविध स्टील कंपन्यांबरोबर जवळपास ८१ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या करारांमुळे ४० हजारापेक्षा जास्त रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, रायगड, छत्रपती संभाजीनगर, साताऱ्यात हे प्रकल्प येणार आहेत. यातून राज्यातल्या स्टील उद्योगाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि केंद्...