November 12, 2024 10:09 AM November 12, 2024 10:09 AM
9
केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवी दिल्ली इथं AIIB च्या शिष्टमंडळासोबत घेतली बैठक
केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी काल नवी दिल्ली इथं एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक अर्थात AIIB च्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. गेल्या काही वर्षांत बँकेची झालेली उल्लेखनीय वाढ आणि कामगिरीबद्दल अर्थमंत्र्यांनी बँकेचं कौतुक केलं. बँकेची प्रशंसा करतानाच त्यांनी भारताच्या भक्कम स्थूल आर्थिक नियोजनामधील मूलभूत आर्थिक गोष्टी आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात तसंच त्याचा उपयोग करण्यासाठी वापरण्यात आलेल्या प्रेरणादायी भारतीय नेतृत्वाचा उल्लेख...