August 19, 2024 1:35 PM August 19, 2024 1:35 PM
16
नाशिकमध्ये देशातला पहिला एआय कुंभमेळा
देशातला पहिला एआय अर्थात कृत्रिम बुद्धीमत्ता कुंभमेळा नाशिकमध्ये होणार आहे. या अनुषंगानं काल नाशिकमध्ये तंत्रज्ञान आणि परंपरेचा संगम साधणाऱ्या, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या बिल्डथॉनचं, उद्धाटन विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांच्या हस्ते झालं. यावेळी राज्य शासनाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी अत्याधुनिक कृत्रिम बुद्धीमत्ता साधनांवर आधारित सादरीकरण केलं. कुंभथॉनच्या अधिकृत संकेतस्थळाचं तसंच कुंभ मेळ्यासाठी समर्पित एआय - सक्षम चॅटबॉटचं उद्धाटनही करण्यात आलं.