December 3, 2025 1:09 PM

views 25

समाज माध्यमांचा दुरुपयोग आणि फेक न्यूज प्रकरणी कठोर कारवाई होणार

समाज माध्यमांचा दुरुपयोग आणि फेक न्यूजचा विषय अत्यंत गंभीर असून या दोन्ही बाबींवर तसंच एआयनिर्मित आक्षेपार्ह आशयांवरही कठोर कारवाई करणं गरजेचं आहे, असं केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आज लोकसभेत म्हणाले. प्रश्नोत्तराच्या तासात या संदर्भात विचारलेल्या  प्रश्नावर ते उत्तर देत होते. समाज माध्यमांचा उपयोग करून एक समांतर परिसंस्था तयार होत असून त्याद्वारे भारतीय संविधानाला आणि कायद्यांचं पालन न करण्याकडे कल दिसून येतो, त्यावर कठोर नियम बनवण्याची गरज असल्याचंही वैष्णव यावेळी म्हणा...