October 25, 2025 8:09 PM October 25, 2025 8:09 PM

views 166

AI चा वापर करणारा सिंधुदुर्ग देशातला पहिला जिल्हा

प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करणारा देशातला पहिला जिल्हा ठरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी  नीती आयोगाचं एक पथक ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्गात येत आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी आज ओरोस इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. निती आयोगाचं पथक या दौऱ्यात आरोग्य, शिक्षण, संरक्षण आणि कृषी विभागात कृत्रिम बुद्धीमत्तेच्या सहाय्याने सुरु असलेल्या कामांचा अभ्यास करणार आहे.    सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु असून क...

October 11, 2025 7:03 PM October 11, 2025 7:03 PM

views 28

राज्य शासनाचं कृत्रिम बुद्धिमत्ता स्विकारण्याचं धोरण सुरू- मुख्यमंत्री

राज्य शासनानं कृत्रिम बुद्धिमत्ता स्विकारण्याचं धोरण सुरू केलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते आज मुंबईत वांद्रे इथं मेहबुब स्टुडिओत एचपी आणि इंटेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘एचपी ड्रीम अनलॉक्ड’ या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. तंत्रज्ञान प्रत्येक भारतीयाच्या कल्पनांना आकार देऊ शकते असं ते म्हणाले. आजचा काळ कृत्रिम बुद्धिमत्तेचा असून या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजात साक्षरता आणि समता निर्माण होऊ शकते असं त्यांनी सांगितलं. शासनानं एचपी सोबत डिजिट...

August 7, 2025 3:36 PM August 7, 2025 3:36 PM

views 14

धाराशिवमध्ये सोयाबीनच्या उत्पादकतेत वाढ करण्यासाठी AI चा वापर

राज्यात सोयाबीनच्या उत्पादकतेत वाढ व्हावी या उद्देशाने धाराशिव तालुक्यात उपळा इथे एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येणार आहे. या प्रयोगांतर्गत १० शेतकऱ्यांच्या शेतात स्वयंचलित हवामान केंद्र तर १० शेतकऱ्यांच्या शेतात एआय सेन्सर्स बसवण्यात आले आहेत. या हवामान केंद्रांच्या २० किलोमीटर परिघातल्या शेतकऱ्यांना पाऊस, वातावरणातली आर्द्रता, उष्णता यांची निरीक्षणं एआयच्या माध्यमातून मिळणार आहेत. राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीनं सुरू झालेला हा देशातला पहिला प्रकल्प आहे. या तंत्रज्ञानाच्या...

May 5, 2025 7:11 PM May 5, 2025 7:11 PM

views 25

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ही काळाची गरज – उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यात शेती, उद्योग, शिक्षण इत्यादी क्षेत्रांमधे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ही काळाची गरज बनली असून या क्षेत्रात पुढाकार घेणाऱ्या सर्वांना शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र स्थापन करणं आणि इतर क्षेत्रातला एआयचा वापर, याकरता राज्य शासनानं मायक्रोसॉफ्ट उद्योगाबरोबर करार केला आहे, त्याअंतर्गत बारामती इथं आयटीपार्क किंवा इनोव्हेशन सेंटर उभारण्याबाबत आज मंत्रालयात आयोजित बैठकीत पवार बोलत होते. त्यादृष्टीनं कुशल मनुष्यबळ मि...

April 8, 2025 7:33 PM April 8, 2025 7:33 PM

views 15

विठ्ठल मंदिरात वारी वेळी होणाऱ्या गर्दीच्या व्यवस्थानासाठी एआयचा वापर करणार

पंढरपूर इथल्या विठ्ठल मंदिरात वारीच्या वेळी होणाऱ्या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानाची चाचणी आज पंढरपुरात घेण्यात आली. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गर्दीचं प्रमाण, गर्दीची घनता मोजता येणार आहे. चेहरे ओळखण्याच्या प्रणालीद्वारे हरवलेली अथवा मदतीची गरज असलेल्यांचा शोध घेणं शक्य होणार आहे. तसंच, एखाद्या विशिष्ट ठिकाणी गर्दीची घनता जास्त आढळल्यास त्याविषयी तात्काळ सूचना मिळू शकणार आहे.

March 19, 2025 10:48 AM March 19, 2025 10:48 AM

views 14

लोकसभेतलं कामकाज सर्व भाषांमध्ये उपलब्ध होण्यासाठी AI अंतर्गत सामंजस्य करार

लोकसभेतील चर्चा आणि कामकाज सर्व भाषांमध्ये उपलब्ध होण्याच्या उद्देशानं कृत्रिम बुध्दीमत्ता अभियानाअंतर्गत काल एक सामंजस्य करार करण्यात आला. नवी दिल्ली इथे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत हा करार झाला. या माध्यमातून एआय कोश नावाचा एक डेटा सेट तयार केला जाणार आहे. एआय कोशमुळे लोकसभेतील व्यापक चर्चा आणि वादविवादांचं कोणत्याही भाषेत भाषांतर केलं जाणार आहे.

February 28, 2025 4:04 PM February 28, 2025 4:04 PM

views 18

योजनांच्या अंमलबजावणीसाठी AIचा वापर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्य शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी एआयचा वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. शासनाच्या कृती आराखड्यानुसार होणाऱ्या कामांचा आढावा घेण्यासाठी मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. विविध विभाग आणि पातळीवर उत्कृष्ट काम करत असलेल्या १५ विभागांच्या कामांचं सादरीकरण यावेळी करण्यात आलं. नाविन्यपूर्ण काम केलेल्या अधिकारी आणि कार्यालयांचे कौतुक करून त्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. यात मुंबई...

February 25, 2025 8:51 AM February 25, 2025 8:51 AM

views 18

महाराष्ट्र AI आणि तंत्रज्ञान क्रांतीचं नेतृत्व करेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राज्य शासन प्रशासकीय कामकाज आणि अर्थव्यवस्थेला गती देत आहे; महाराष्ट्र लवकरच देशाच्या एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचं नेतृत्व करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नॅसकॉम तंत्रज्ञान आणि नेतृत्व परिषदेत ते काल मुंबईत बोलत होते.   देशातली ६० टक्के डेटा सेंटर्स महाराष्ट्रात आहेत. २०३०पर्यंत राज्यातली ५० टक्के वीजनिर्मिती हरित ऊर्जेवर आधारित असेल असं फडणवीस म्हणाले. शेतीमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेतकऱ्यांचं उत्पन...

February 11, 2025 7:05 PM February 11, 2025 7:05 PM

views 14

AIचा जबाबदारीनं वापर आणि नियमनासाठी जागतिक पातळीवर एकत्रित प्रयत्नांची गरज – प्रधानमंत्री

AI अर्थात कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्राचा जबाबदारीनं वापर आणि नियमन यासाठी जागतिक पातळीवर एकत्रितरित्या प्रयत्न करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केली. पॅरिसमध्ये AI कृती परिषदेत सह अध्यक्षपदावरुन ते संबोधित करत होते. सह अध्यक्ष फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन यावेळी उपस्थित होते. या तंत्रज्ञानाचं भविष्य यंत्र नव्हे तर मानवाच्या हातात आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा विकास जबाबदारी,  सामाजिक आणि नैतिक हित ध्यानात ठेवून होईल, याकडे लक्ष देण्याचं आवाहन त्यांनी उपस्थिता...

January 17, 2025 7:35 PM January 17, 2025 7:35 PM

views 38

राज्य सरकारकडून AI धोरण तयार करण्यासाठी कृती दलाची स्थापना

  राज्य सरकारनं आर्टिफिशियल इंटिलिजन्स आणि सायबर सुरक्षा धोरण तयार करण्यासाठी कृती दलाची स्थापना केली आहे. राज्याचे माहिती तंत्रज्ञान संचालक या दोन्ही कृती दलाचे अध्यक्ष आहेत. याशिवाय खासगी क्षेत्रातल्या अनेक तज्ञांचा समावेश यामध्ये आहे. AI धोरण राज्याच्या औद्योगिक विकासाला चालना देईल, असं माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार म्हणाले. तर नागरिक, शैक्षणिक संस्था, उद्योग, स्टार्टअप्स आणि सरकारी क्षेत्रासाठी एक मजबूत सायबर सुरक्षा प्रणाली निर्माण करणे, सरकारी आणि निमसरकारी आयटी पायाभूत सुविधांची सुर...