December 7, 2025 8:13 PM December 7, 2025 8:13 PM

views 20

अहमदाबादमध्ये गृहमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज गुजरातमधल्या अहमदाबाद इथं विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं. अहमदाबादच्या थलतेज परिसरातल्या ८६१ घरांचं त्यांनी उद्घाटन केलं. दक्षिण बोपलमध्ये इलेक्ट्रोथर्म कंपनीनं अहमदाबाद महानगरपालिकेच्या सहकार्यानं विकसीत केलेल्या इलेक्ट्रोथर्म बागेचं, शाह यांनी उद्घाटन केलं. याशिवाय, सरखेज आणि वस्त्रपूर इथं तलाव, मेमनगर इथं पार्टी भूखंड आणि नवा वडाज इथल्या साडेतीनशे घरांचं उद्घाटन केलं. न्यू रणीप इथली व्यायामशाळा आणि वाचनालयाला भेट दिल्यानंतर त्यांन...

June 29, 2025 3:14 PM June 29, 2025 3:14 PM

views 21

अहमदाबाद विमान अपघात प्रकरणी घातपाताची शक्यता आढळली नसून सर्वंकष चौकशी होईल, असं हवाई वाहतूक राज्यमंत्र्यांचं आश्वासन

अहमदाबाद इथं झालेल्या विमान अपघाताची विमान अपघात अन्वेषण संस्था सर्वंकष चौकशी करेल, असं माहिती नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं. एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या अपघातामागे घातपाताची शक्यता आहे का या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितलं की सध्यातरी यामागे दहशतवादी कट असल्याचं आढळून आलेलं नाही. अहमदाबाद इथं १२ जून रोजी लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात होऊन २७४ जणांचा मृत्यू झाला. या विमानाचा ब्लॅकबॉक्स सापडला असून तो विमान अपघात अन्वेष...

April 28, 2025 8:24 PM April 28, 2025 8:24 PM

views 18

अहमदाबादमधे अवैधरित्या राहणारे ४०० बांगलादेशी संशयित ताब्यात

पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधे अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी व्यापक शोधमोहीम राबवली जात आहे. अहमदाबादमधे अवैधरित्या राहणाऱ्या चारशे संशयितांना पकडण्यात आलं आहे.  शहरातले बेकायदेशीर बांधकामं पाडण्याचे आणि बेकायदेशीर वीज जोडणी तोडण्याचे आदेश अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी एस मलिक यांनी दिले आहेत. मोरबी इथं दहा बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. नवसारी, जलालपोर, गंदेवी, चिखली, बिलीमोरा आणि खेरगाम मधेही शोधमोहीम सुरू आहे.

March 1, 2025 1:47 PM March 1, 2025 1:47 PM

views 19

रेल्वेमंत्र्यांनी केली अहमदाबाद रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामाची पाहणी

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज अहमदाबाद रेल्वे स्थानकाला भेट देऊन तिथं सुरु असलेल्या पुनर्विकास कामाची पाहणी केली. अहमदाबाद रेल्वे स्थानकाचा विकास अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं केला जात असून येत्या तीन - साडे तीन वर्षात हे काम पूर्ण होईल, असं वैष्णव यांनी सांगितलं. गुजरातच्या विकासासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे, गुजरातमध्ये लवकरच रेल्वे मार्गाचं १०० टक्के विद्युतीकरण पूर्ण होईल, असं ते म्हणाले. यावर्षीच्या अर्थसंकल्पात गुजरातसाठी १७ हजार १५५ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद केली आहे, अस...

October 29, 2024 1:42 PM October 29, 2024 1:42 PM

views 11

भारत आणि न्यूझीलंड महिला क्रिकेट संघादरम्यान अंतिम सामन्याला अहमदाबादमध्ये प्रारंभ

भारत आणि न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघांदरम्यान एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज अहमदाबादमध्ये होणार आहे. दोन्ही संघांनी आधीचे एक एक सामने जिंकून बरोबरी साधली असल्यामुळे आजचा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा दोन्ही संघ प्रयत्न करतील.  न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा करायचा निर्णय घेतला आहे.