January 28, 2025 3:36 PM January 28, 2025 3:36 PM

views 3

विद्यापीठांमध्ये कला, नाट्यशास्त्र विभागांना अतिरिक्त निधी मिळण्यासाठी प्रयत्न करू – प्रा. राम शिंदे

अहिल्यानगर शहरात सांस्कृतिक संकुल उभे रहावं, यासाठी संबधित विभागाचे मंत्री, नाट्य परिषदेचे पदाधिकारी आणि संबधित अधिकाऱ्यांबरोबर  लवकरच बैठक घेण्यात येईल, तसंच राज्यातल्या विद्यापीठांमध्ये कला आणि नाट्यशास्त्र विभागांना अधिकचा निधी मिळावा यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिली आहे. १०० व्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्यसंमेलनाच्या समारोप प्रसंगी काल ते बोलत होते.

December 1, 2024 7:13 PM December 1, 2024 7:13 PM

views 16

अहिल्यानगर इथं सत्यशोधक समाजाच्या ४२ व्या अधिवेशनाचं उद्घाटन

अहिल्यानगर इथं सत्यशोधक समाजाच्या ४२ व्या अधिवेशनाचं उद्घाटन आज साहित्यिक लहु कानडे यांच्या हस्ते झालं. महात्मा फुले हे आधुनिक भारताच्या प्रबोधन युगाचे पितामह असून त्यांच्या विचारातूूनच लोकशाहीचा पाया घातला गेला असं कानडे यावेळी म्हणाले. उत्तमराव पाटील हे कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष होते. यावेळी दिशा वाडेकर यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उल्लेखनीय वकील पुरस्कार तर सुकन्या शांता यांना दीनमित्रकार मुकुंदराव पाटील उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला.

October 19, 2024 10:49 AM October 19, 2024 10:49 AM

views 19

अकोले तालुक्यात भंडारदर्‍याच्या कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात फुलांचा उत्सव सुरू 

अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसराला निसर्गाचं वरदान लाभलं आहे. इथला पाऊस अनुभवण्यासाठी राज्याच्या विविध भागातून आणि परराज्यातूनही पर्यटक मोठ्या प्रमाणावर भंडारदर्‍याला भेट देत असतात. वर्षा ऋतूमध्ये कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात कोसळणारे अनेक लहान मोठे धबधबे पर्यटकांचं प्रमुख आकर्षण असतं. आता पावसाळा संपल्यानंतर इथं फुलांचा उत्सव सुरू झाला आहे. हिरवे डोंगर आणि त्यावर अनेकविध रंगांची सुंदर फुलं आता पर्यटकांना आकर्षून घेत आहेत. सोनकीच्या फुलांनी संपूर्ण रतनगड पिवळसर झाला आहे; त्यातच घोडेधारीजवळ क...

October 5, 2024 2:36 PM October 5, 2024 2:36 PM

views 9

अहमदनगरचं अहिल्यानगर नामकरण करण्याला केंद्र सरकारची मंजुरी

अहमदनगर जिल्ह्याचं अहिल्यानगर असं नामांतर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल ट्विट संदेशातून ही माहिती दिली. या निर्णयाबद्दल विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचे आभार व्यक्त केले आहेत.

September 3, 2024 8:55 PM September 3, 2024 8:55 PM

views 30

अहमदनगर जिल्‍ह्याचा नामांतराचा मार्ग सुकर

अहमदनगर जिल्‍ह्याला अहिल्‍यानगर नाव द्यायला रेल्‍वे मंत्रालयानं हिरवा कंदिल दिल्यानं जिल्‍ह्याच्‍या नामांतराचा मार्ग सुकर झाला असल्‍याचं जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी सांगितलं.   जिल्‍ह्याला पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवींचे नाव देण्‍याची मागणी झाल्‍यानंतर महायुती सरकारनं अहिल्‍यानगर असं नाव देण्‍याचा निर्णय घेतला. मात्र नामांतराच्‍या बाबतीत सर्व प्रक्रीया केंद्र सरकारच्‍या अखत्‍यारीत पूर्ण होत असल्‍यानं प्रत्‍येक विभागाची ना हरकत आवश्‍यक असते. आता रेल्वे मंत्रालयानं, नामांतर...