October 18, 2025 3:12 PM October 18, 2025 3:12 PM

views 69

अहिल्यानगर जिल्ह्यात नुकसानग्रस्तांना मदत जाहीर

अहिल्यानगर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नूकसानीपोटी ८ लाख २७ हजार ११८ शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाख रूपयांची मदत महायुती सरकारनं जाहीर केल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. दिवाळीपुर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत वर्ग करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

June 9, 2025 2:29 PM June 9, 2025 2:29 PM

views 4

DRDOच्या वाहन संशोधन आणि विकास संस्थेकडून ९ संरक्षण प्रणालींचं तंत्रज्ञान १० भारतीय उद्योगांकडे हस्तांतरित

महाराष्ट्रातील अहिल्यानगर इथल्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात डीआरडीओच्या वाहन संशोधन आणि विकास संस्थेनं नऊ संरक्षण प्रणालींचं तंत्रज्ञान 10 भारतीय उद्योगांना हस्तांतरित केलं आहे. या प्रणालींमध्ये रसायनिक, जैविक, किरणोत्सारी, अण्विक, रेकी वाहन, माउंटेड गन सिस्टीम, दहशतवादी-विरोधी वाहन आणि दंगल नियंत्रण वाहन वज्र यांचा समावेश आहे. तंत्रज्ञान हस्तांतरण समारंभाला डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर कामत उपस्थित होते. ऑपरेशन सिंदूर दरम्यान स्वदेशी बनावटीच्या प्रणालींनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्...

May 29, 2025 9:53 AM May 29, 2025 9:53 AM

views 37

अहिल्यानगरमध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना

अहिल्यानगर जिल्ह्यात पावसामुळे मोठं नुकसान झालं असून नुकसानाचे सरसकट पंचनामे अधिकचं मनुष्यबळ उपलब्ध करून तातडीनं करावेत. शासनाच्या स्थायी आदेशाप्रमाणे आपतीग्रस्तांना मदत मिळेलच, परंतू विशेष बाब म्हणूनही मदत आणि पुनर्वसन विभागाकडे मदतीचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जलसंपदामंत्री आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. या संकटप्रसंगी सरकार पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली. जिल्हयात पावसानं झालेल्या नुकसानीची पाहणी विखे पाटील यांनी नगर तालुक्यातील सोनवाडे, ...

May 24, 2025 2:20 PM May 24, 2025 2:20 PM

views 4

अहिल्यानगरचे शहीद जवान संदीप गायकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातले शहीद जवान संदीप गायकर यांच्या पार्थिवावर आज ब्राह्मणवाडा इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. गुरुवारी पहाटे जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड सेक्टरमध्ये सीमेवर दहशतवाद्यांविरोधात लढताना त्यांना वीरमरण आलं. त्यांच्या बलिदानानं संपूर्ण अकोले तालुका आणि अहिल्यानगर जिल्हा शोकसागरात बुडाला. या वीर जवानाला शेवटची मानवंदना देण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. हजारो नागरिकांनी साश्रू नयनांनी वीर जवानाला निरोप दिला. यावेळी 'भारत माता की जय', 'संदीप गायकर अमर रह...

May 15, 2025 3:51 PM May 15, 2025 3:51 PM

views 11

अहिल्यानगरमध्ये कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीरामपूर एमआयडीसी परिसरात पोलिसांनी काल रात्री केलेल्या कारवाईत कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या कारवाईत पोलिसांनी अन्न आणि औषध प्रशासनानं बंदी घातलेल्या अल्प्रझोलम या औषधासह १३ कोटी ७५ लाख ४१ हजार रुपयांचा माल जप्त केला. या प्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून एका व्यक्तीला अटक केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.  

May 2, 2025 7:47 PM May 2, 2025 7:47 PM

views 38

अहिल्यानगरचे माजी आमदार अरुण जगताप यांचं निधन

अहिल्यानगरचे माजी आमदार अरुण जगताप यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं, ते ६७ वर्षांचे होते. जगताप यांनी तत्कालीन अहमदनगर नगरपालिकेचे अध्यक्ष, जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, आयुर्वेद शास्त्र मंडळाचे अध्यक्ष अशी अनेक महत्वाची पदं भूषवली. या पदांसह ते दोन वेळा काँग्रेसकडून विधान परिषदेवर निवडून आले होते. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही सलग दोनवेळा स्थानिक स्वराज्य संस्थामतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून गेले होते.

April 7, 2025 3:29 PM April 7, 2025 3:29 PM

views 17

अहिल्यानगरमधल्या १११ शाळांमधे इंटरॅक्टिव्ह टच पॅनल आणि डिजिटल ई लर्निंग सॉफ्टवेअरचं लोकार्पण

‘डिजिटल स्कूल’ या संकल्पनेअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातल्या १११ शाळांमधे इंटरॅक्टिव्ह टच पॅनल आणि डिजिटल ई लर्निंग सॉफ्टवेअरचं लोकार्पण आज विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे करण्यात आलं. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच जिल्ह्यातले गटविकास अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते. या कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळेतल्या दोन विद्यार्थ्यांनी शिंदे यांच्याशी ऑनलाईन संवाद साधला. 

March 25, 2025 7:23 PM March 25, 2025 7:23 PM

views 13

अहिल्यानगरचे सुपुत्र हवालदार रामदास बढे कर्तव्य बजावताना शहीद

अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपूत्र हवालदार रामदास साहेबराव बढे आज जम्मू आणि काश्मीरमधील तंगधर जिल्ह्यात कर्तव्य बजावत असताना शहीद झाले. त्यांच्या पार्थीवावर उद्या २६ मार्च २०२५ रोजी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. संगमनेर तालुक्यातल्या मेंढवण या त्यांच्या मूळ गावी उद्या दुपारी १ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. यावेळी लष्करातले जवान आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत.   हवालदार रामदास बढे हे लष्कराच्या युनिट ३४ अंतर्गत फिल्ड रेजीमेंट मध्ये कार्यरत होते. २४ मार्च २०२५ रोजी नियंत्रण...

March 14, 2025 8:59 AM March 14, 2025 8:59 AM

views 17

अहिल्यानगर जिल्ह्यात मढी यात्रेला सुरुवात

भटक्यांच्या पंढरी म्हणून ओळख असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या मढीच्या यात्रेला काल सुरुवात झाली. मंदिराच्या कळसाला नाथांची काठी लावून हा यात्रा उत्सव सुरू होतो. पहिल्या दिवशी कैकाडी समाजाला काठीचा मान असतो त्यानंतर गोपाल समाजालादेखील या काठीचा मान दुसरा आहे. कालच्या होळीच्या सणानंतर आज सर्वत्र धूलिवंदन साजरं होत आहे. राज्यात अनेक ठिकाणी आज रंगोत्सव साजरा केला जातो; हा सण साजरा करताना पर्यावरणपूरक रंग वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी रंगपंचमीच्या दिवशी देखील रंगोत्सव साजरा क...

February 19, 2025 3:42 PM February 19, 2025 3:42 PM

views 11

अहिल्यानगर जिल्ह्यासाठी तूर खरेदीसाठी १२ केंद्रांना मंजुरी

आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी पणन महासंघानं तूर खरेदीसाठी १२ केंद्रांना मंजुरी दिली. नऊ केंद्रांवरून हमीभावानं तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी तसंच प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया सुरू केल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी बी.आर. पाटील यांनी दिली.   २०२४-२५ हंगामासाठी तूर पिकाची ७ हजार ५५० प्रति क्विंटल दरानं १३ फेब्रुवारीपासून खरेदी प्रक्रिया सुरू झाली आहे.  ९ केंद्रावरून शेतकऱ्यांची ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी सुरू आहे.