August 13, 2024 4:45 PM

views 15

मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘अहिल्या भवन’ उभारणार – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबईत मानखुर्द इथं अहिल्या भवन उभारणार असल्याची घोषणा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज केली. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं भवन उभारलं जाईल असं ते म्हणाले. या इमारतीत महिला आयोग आणि बालहक्क आयोगाचे मुंबई विभागाचं कार्यालय असेल. ३५ हजार ५०० चौरस मीटर इतक्या परिसरात हे भवन उभारलं जाणार असून त्यासाठी ४७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचं मंत्री लोढा यांनी सांगितलं.