November 21, 2025 3:34 PM November 21, 2025 3:34 PM

views 25

१६व्या ॲग्रोव्हिजन संमेलनाचं केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

ॲग्रो व्हिजन हा ज्ञान-विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा त्रिवेणी संगम असून कृषी संशोधन संस्था, खासगी उद्योग आणि कृषी विद्यापीठ यांना एकत्र आणून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठीचा उत्तम मंच असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज केलं. नागपूरमध्ये सोळाव्या ॲग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. पीक विम्यामध्ये आणखी दोन प्रकारच्या नुकसानीचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याची गरज व्यक्त करतान...