May 19, 2025 8:18 PM May 19, 2025 8:18 PM
50
कृषी कर्जासाठी शेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्जपुरवठा करण्याची बँकांना ताकीद
कृषी कर्जासाठी शेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्जपुरवठा करा, अशी ताकीद मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी बँकांना दिली आहे. ते आज मुंबईत राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या १६७ व्या बैठकीत बोलत होते. यावेळी राज्याचा २०२५-२६ या वित्तीय वर्षाचा ४४ लाख ७६ हजार ८०४ कोटी रुपयांचा पतपुरवठा आराखडाही मंजूर करण्यात आला. शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा पुरवठा झाला नाही तर त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेसोबतच शेतकरी आत्महत्यांमध्ये होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना सी-बिल मागू नका, हे वारंवार सांगितलं, तरी बँका सिबिल मागता...