December 26, 2024 3:17 PM

views 358

अकोल्यात उद्यापासून २९ डिसेंबरपर्यंत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अकोल्याचं डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, राज्यशासनाचा कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने उद्यापासून येत्या २९ डिसेंबरपर्यंत राज्यस्तरीय  कृषी प्रदर्शन अकोला इथं भरवण्यात येणार आहे.  प्रदर्शनाचं  उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अन्य मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या प्रदर्शना...

August 31, 2024 6:07 PM

views 22

अहमदनगर जिल्ह्यातल्या लोणी इथं शिवार फेरी व कृषी प्रदर्शनाचं आयोजन

कृषी उत्पादन वाढवण्यासाठी तरुणांनी नवीन तंत्रज्ञान शिकून घ्यायला हवं असं राज्याचे महसूल पशूसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या लोणी इथं कृषी खात्याने आयोजित केलेल्या शिवार फेरी व कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. सेंद्रीय पद्धतीने पिकवलेला कृषीमालाच्या विक्रीसाठी शिर्डीत विक्रीकेंद्र सुरु करता येईल असं ते म्हणाले. कृषी महाविद्यालये आणि संशोधन केंद्रांनी शेतकऱ्याच्या बांधापर्यंत  कृषी तंत्रज्ञान पोचवायला हवं असं त्यांनी सांगितलं. ...