October 22, 2024 10:32 AM October 22, 2024 10:32 AM

views 12

पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालण्याबाबत भारत आणि चीन यांच्यात करार

लडाखमधल्या पूर्व भागातल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालण्याबाबत भारत आणि चीन यांच्यात करार झाला आहे. या करारामुळे 2020 पासून निर्माण झालेला दोन्ही देशांमधला तणाव निवळण्याची शक्यता असल्याचं परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री नवी दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले. दोन्ही देशांमध्ये याबाबत सविस्तर चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला, असंही ते म्हणाले. तसंच, रशियन सैन्यात लढलेल्या भारतीयांच्या परत येण्याविषयीही मिस्री यांनी माहिती दिली. रशियातून 85 भारतीय मायदेशी परतले आहेत आणि जवळपास 20 ...

October 15, 2024 9:53 AM October 15, 2024 9:53 AM

views 12

भारत आणि कोलंबिया यांच्यात आज नवी दिल्लीत दृक-श्राव्य कार्यक्रमांच्या सहनिर्मितीबाबत करार करण्यात येणार

भारत आणि कोलंबिया यांच्यात आज नवी दिल्लीत दृक-श्राव्य कार्यक्रमांच्या सहनिर्मितीबाबत करार करण्यात येणार आहे. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आणि कोलंबियाच्या परराष्ट्र खात्याचे उपमंत्री जॉर्ज एन्रिके-रोखास रॉड्रिगेझ यांच्यासह दोन्ही देशांचे अन्य प्रतिनिधी या करारावर स्वाक्षरी करतील