December 26, 2025 8:03 PM December 26, 2025 8:03 PM
17
अगरबत्तीसाठी नवीन गुणवत्ता मानक जाहीर
अगरबत्तीसाठी भारतीय मानक ब्युरोनं नवीन गुणवत्ता मानक जाहीर केलं आहे. यात अगरबत्ती उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या घातक कीटकनाशकांवर आणि रसायनांवर बंदी घातली आहे. भारताचा ८ हजार कोटी रुपयांचा अगरबत्ती बाजार विस्तारण्यासाठी आणि ग्राहकांच्या आरोग्याची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे निकष जाहीर झाले आहेत. भारताचा अगरबत्ती उद्योग दरवर्षी सुमारे बाराशे कोटी रुपयांची उत्पादने अमेरिका, मलेशिया, नायजेरिया, ब्राझील आणि मेक्सिको यांसारख्या १५० हून अधिक देशांमध्ये निर्यात करतो.