March 30, 2025 8:59 PM March 30, 2025 8:59 PM

views 4

नागालँडमधे पोलीस ठाणे क्षेत्रात सशस्त्र दल विशेष अधिकार कायद्याला मुदतवाढ

गृह मंत्रालयानं आज नागालँडमधले आठ जिल्हे आणि इतर ५ जिल्ह्यांच्या २१ पोलिस ठाणं क्षेत्रात सशस्त्र दल विशेष अधिकार कायद्याला आणखी सहा महिन्यांसाठी मुदतवाढ दिली आहे. ही वाढ १ एप्रिल २०२५ पासून लागू होईल. गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, दिमापूर, न्यू लँड, चुमोकेदिमा, मोन, किफिरे, नखलक, फेक आणि पेरेन जिल्ह्यांमध्ये सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा सुरू राहील. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिसूचनेत म्हटलं आहे.