September 26, 2024 2:34 PM September 26, 2024 2:34 PM
5
अफस्पाला आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा गृह मंत्रालयाचा निर्णय
अरुणाचल प्रदेशातले तीन जिल्हे आणि नामसाई जिल्ह्यातील काही भागांत सशस्त्र बल विशेषाधिकार अधिनियम अर्थात अफस्पाला आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय गृह मंत्रालयानं घेतला आहे. येत्या एक ऑक्टोबरपासून ही मुदतवाढ लागू होईल. अरुणाचल प्रदेशातील तिरप, चांगलांग आणि लोंगडिंग जिल्ह्यात तसंच नमसाई जिल्ह्यासह महादेवपूर आणि चौखम पोलिस ठाण्याच्या अधिकार क्षेत्रातील भाग अशांत म्हणून जाहीर केल्याचं गृहमंत्रालयानं या संदर्भात काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. नागालँडमधील आठ जिल्हे आणि पाच जिल्ह्यांतील काही...