February 21, 2025 9:04 AM

views 22

पश्चिम आशियाई प्रदेशातील शांतता आणि स्थैर्य संपूर्ण जगासाठी आवश्यक- डॉक्टर एस.जयशंकर

सध्याची जागतिक भू-राजकीय परिस्थिती कठीण असून पश्चिम आशियाई प्रदेशातील शांतता आणि स्थैर्य संपूर्ण जगासाठी आवश्यक आहे,असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉकटर एस.जयशंकर यांनी व्यक्त केलं.ते काल दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये जी वीस (G20) परिषदेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत बोलत होते.   मतभेदाचं रूपांतर वाद आणि संघर्षात होऊ नये,तसंच संघर्षामुळे मोठे नुकसान होता कामा नये असंही जयशंकर यावेळी म्हणाले. दरम्यान, त्यांनी काल जोहान्सबर्गमध्ये रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गेई लावरोव यांची भेट घ...

November 8, 2024 10:05 AM

views 15

भारत आणि दक्षिण अफ्रिकेदरम्यानचा पहिला टी 20 क्रिकेट सामना आज डर्बनमध्ये

भारत आणि दक्षिण अफ्रिकेदरम्यानच्या चार टी-20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज रात्री डर्बनमध्ये होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडेआठ वाजता सामन्याला सुरूवात होईल.   सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला परदेशी भूमीवर उत्तम कामगिरी दाखवण्याची संधी आहे. या संघानं घरच्या मैदनावर बांग्लादेश विरूद्धची टी-20 मालिका 3-0 नं जिंकली होती. सध्या भारतीय संघ टी-20 संघ क्रमवारीत अव्वल स्थानावर तर दक्षिण अफ्रिका सहाव्या स्थानावर आहे.

September 28, 2024 11:29 AM

views 13

अफ्रिकेत मंकीपॉक्स आजाराचे ३२ हजार ४०० रुग्ण

अफ्रिकेत यावर्षीच्या सुरुवातीपासून मंकीपॉक्स या आजाराचे 32 हजार 400 रुग्ण आढळून आल्याची माहिती अफ्रिकेतील रोगनियंत्रण आणि प्रतिबंध विभागाच्या अफ्रिका केंद्रानं काल दिली. यामध्ये 6 हजार चारशेपेक्षा अधिक रुग्णांना लागण झाल्याची खात्री झाली असून 840 नागरिकांचा मंकापॉक्सनं मृत्यू झाला आहे अशी माहिती या विभागानं दिली आहे. अनेक देशांमध्ये या आजाराचा फैलाव झाल्याच्या पार्श्वभूमीवरव काल दुरस्थ पध्दतीनं आढावा घेण्यात आला. त्यावेळी अफ्रिकेचे आरोग्य विभागातील डिरेक्टर जनरल जीन कसेया यांनी ही माहिती दिली. &...