October 18, 2025 10:40 AM October 18, 2025 10:40 AM
14
अफगाणिस्तानच्या पक्तिका भागात पाकिस्ताननं केलेल्या हवाई हल्ल्यात दोन लहान मुलांसह सहा जणांचा मृत्यू
अफगाणिस्तानच्या पक्तिका भागात पाकिस्ताननं केलेल्या हवाई हल्ल्यात काल दोन लहान मुलांसह किमान सहा जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही देशांनी दोन दिवसांचा युद्धबंदी करार केला असतानाही हा हल्ला झाला असं टोलो या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. अर्गन आणि बारमल जिल्ह्यातल्या रहिवासी भागातहे हवाई हल्ले करण्यात आले.