October 19, 2025 10:13 AM

views 58

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमासंघर्षाच्या पार्श्वभुमीवर उभय देशांची तत्काळ युद्धबंदीवर सहमती

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सीमासंघर्षाच्या पार्श्वभुमीवर उभय देशांनी तत्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. कतारच्या परराष्ट्र मंत्र्‍यांनी काल ही घोषणा केली. कतारची राजधानी दोहा इथं, कतार आणि तुर्किएच्या मध्यस्थीने झालेल्या चर्चेत दोन्ही देशांदरम्यान हा करार करण्यात आला. या वाटाघाटींदरम्यान तत्काळ युद्धबंदी आणि दोन्ही देशांदरम्यान कायमस्वरूपी शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी पाठपुरावा बैठका घेण्यावर सहमती दर्शवण्यात आली असल्याचं कतारच्या परराष्...

May 20, 2025 1:23 PM

views 39

अफगाणी नागरिकांना भारताची मदत

पाकिस्ताननं त्यांच्या देशातल्या अफगाणी नागरिकांना परत पाठवायला सुुरुवात केली असून भारतानं या कुटुंबांना मानवीय दृष्टीकोनातून मदत पाठवली आहे. पाकिस्ताननं पाच हजार अफगाणी कुटुंबांना परत पाठवलं होतं. भारतानं या कुटुंबांना ११ प्रकारची अन्न पाकिटं पुरवली आहेत. काबुलच्या स्थलांतरीत निदेशालयातर्फे या मदतीचं वाटप करण्यात आलं. या मदतीबद्दल अफगाणीस्ताननं भारताचे आभार मानले असून इतर देशांनाही मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

March 23, 2025 8:24 PM

views 49

अफगाणिस्तान गृहमंत्र्यांसह तालिबान संघटनेच्या ३ नेत्यांवर अमेरिकेनं लावलेलं बक्षीस मागे

अफगाणिस्तानचे गृहमंत्री सिराजउद्दीन हक्कानी यांच्यासह तालिबान संघटनेच्या ३ नेत्यांवर अमेरिकेनं लावलेलं बक्षीस मागे घेतलं आहे.  सिराजउद्दीन हक्कानी हे अफगाणिस्तानातलं यापूर्वीचं सरकार उलथून टाकणाऱ्या हक्कानी  नेटवर्कचे प्रमुख आहेत. घातक शस्त्रास्त्र निर्मिती आणि हल्ले यासाठी  हे नेटवर्क ओळखलं जातं. त्यातलेच अब्दुल अझीझ हक्कानी आणि याह्या हक्कानी यांच्यावर लावलेलं बक्षीसही अमेरिकेने मागे घेतलं आहे. तालिबानी सरकारचे परराष्ट्र मंत्रालय प्रवक्ते झाकिर जलाली यांनी सांगितलं की गेल्या शुक्रवारी अमेरिकन ...