July 15, 2024 3:15 PM July 15, 2024 3:15 PM

views 18

CUET UG परीक्षा पुन्हा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा १९ जुलै रोजी होणार

CUET UG अर्थात विद्यापीठ प्रवेशासाठीची सामायिक परीक्षा पुन्हा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा १९ जुलै रोजी होणार असल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं कळवलं आहे.इच्छुक विद्यार्थ्यांना इ मेल द्वारे त्यांच्या विषयांचे संकेत क्रमांक कळवण्यात आले आहेत.लवकरच विद्यार्थ्यांना परीक्षेची प्रवेशपत्रं पाठवली जातील.परीक्षेनंतर विद्यार्थ्यांनी पाठवलेल्या शंकांची संख्या लक्षात घेऊन उत्तरसूचीही लवकरच अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केली जाईल,असं एनटीए नं सांगितलं.