February 25, 2025 1:19 PM February 25, 2025 1:19 PM

views 24

विकसित भारताकडे वाटचाल करणारी धोरणं सरकार राबवत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

बदलत्या भूराजकीय आणि आर्थिक परिस्थितीत साऱ्या जगाचं लक्ष भारतावर केंद्रीत झालं असून विकसित भारताच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करणारी धोरणं सरकार राबवत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ॲडवांटेज आसाम या गुंतवणूकदार संमेलनाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केल्यानंतर आज गुवाहाटी इथं ते बोलत होते.   कारखाना क्षेत्राची वाढ आणि रोजगारनिर्मिती याकरता आवश्यक पायाभूत सोयी सुविधा आणि उद्योगांना अनुकूल वातावरण देण्यासाठी केंद्रसरकार वचनबद्ध असल्याचं ते म्हणाले. पूर्वेकडच्या देशांबर...

February 25, 2025 1:19 PM February 25, 2025 1:19 PM

views 14

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ऍडव्हान्टेज आसाम परिषदेचं उद्घाटन होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आसाममधल्या गुवाहाटी इथं आज ऍडव्हान्टेज आसाम या गुंतवणूक आणि पायाभूत सुविधाविषयक परिषदेचं उद्घाटन होणार आहे. उद्घाटन समारंभाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर, केंद्रिय जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल, आसामचे राज्यपाल एल. पी. आचार्य आणि मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा उपस्थित राहणार आहेत. दोन दिवसांच्या या परिषदेत आयोजित विविध सत्रांमध्ये औद्योगिक सुधारणा, जागतिक व्यापार भागीदारी आणि आसाममधील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर भर...