May 27, 2025 1:12 PM May 27, 2025 1:12 PM
18
लढाऊ विमान निर्मिती प्रकल्पाच्या अंमलबजावणीला मान्यता
मध्यम आकाराच्या लढाऊ विमान निर्मिती प्रकल्पाच्या अंमलबजावणीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी मान्यता दिली आहे. नव्या स्वरूपात हा कार्यक्रम राबवताना सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांना समान संधी मिळेल असं संरक्षण मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. या लढाऊ विमानांचं उत्पादन देशात अधिक क्षमतेनं होऊ लागलं की संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेच्या वाटेवर महत्त्वाचा टप्पा पार होईल.