July 27, 2024 1:18 PM July 27, 2024 1:18 PM

views 15

एडीपीसीच्या अध्यक्षपदाची सूत्रं भारताच्या हाती

  भारताने ए डी पी सी अर्थात आशियाई आपत्ती सुसज्जता केंद्राचं अध्यक्षपद स्वीकारलं आहे.  ‘ए डी पी सी’ ही आशियाई आणि पॅसिफिक क्षेत्रात आपत्ती निवारण आणि पर्यावरण लवचिकता याबाबत सहकार्य आणि अंमलबजावणी करणारी स्वायत्त आंतरराष्ट्रीय संघटना असल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयानं सांगितलं आहे.   भारतासह बांग्लादेश, कंबोडिया, चीन, नेपाळ, पाकिस्तान, फिलिपाईन्स, श्रीलंका आणि थायलंड हे शेजारी देश ए डी पी सी चे संस्थापक सदस्य देश आहेत. जागतिक तसंच प्रादेशिक स्तरावर आपत्ती जोखीम नियंत्रण राखण्यात भारताची भूमि...

July 26, 2024 7:52 PM July 26, 2024 7:52 PM

views 9

भारतानं आशियाई आपत्ती व्यवस्थापन केंद्राचं अध्यक्षपद स्वीकारलं

ADPC अर्थात आशियाई आपत्ती व्यवस्थापन केंद्राचं अध्यक्षपद भारतानं काल स्वीकारलं. थायलंडमध्ये बँकॉक इथं भारताच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन आस्थापनेचे राजेंद्र सिंग यांनी चीनकडून या वर्षासाठीचं अध्यक्षपद स्वीकारलं. ADPC ही आशिया आणि पॅसिफिक प्रदेशांमधल्या देशांनी हवामानाशी संबधित संकटांना तोंंड देण्यासाठी सज्ज राहण्याच्या उद्देशाने स्थापन केलेली संस्था आहे. भारतासह बांगलादेश, कंबोडिया, चीन, नेपाळ, पाकिस्तान, फिलिपाईन्स, श्रीलंका आणि थायलंड हे देश संस्थेचे संस्थापक सदस्य आहेत.