July 1, 2025 3:59 PM

views 17

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेसाठी १० जुलै २०२५ पर्यंत मुदतवाढ

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगानं मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयं, स्वायत्त महाविद्यालयं आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थामध्ये २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात राबवण्यात येणाऱ्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी १० जुलै २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याआधी २७ जून ही अंतीम तारीख होती. कुणीही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, यासाठी मुंबई विद्यापीठानं ही मुदतवाढ दिल्याचं म्हटलं आहे. 

March 1, 2025 12:23 PM

views 16

राज्यभरातले इयत्ता अकरावीचे प्रवेश ऑनलाइन

येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यभरातले इयत्ता अकरावीचे प्रवेश ऑनलाइन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यासंदर्भातला शासन आदेश काल प्रसिद्ध झाला.   आतापर्यंत केवळ मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, अमरावती, नागपूर आणि नाशिक महापालिका क्षेत्रातले अकरावी चे प्रवेश ऑनलाइन होत होते. इथून पुढे इयत्ता अकरावी चे सर्व प्रवेश ऑनलाइन होणार आहेत, प्रवेशाच्या पहिल्या चार फेऱ्या झाल्यानंतर वर्ग सुरू होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

June 15, 2024 1:23 PM

views 20

उच्चशिक्षण संस्थांमधला प्रवेश ३० सप्टेंबरपर्यंत रद्द केल्यास विद्यार्थ्यांना शुल्काचा पूर्ण परतावा

उच्चशिक्षण संस्थांमधला प्रवेश विद्यार्थ्यांनी तीस सप्टेंबरपर्यंत रद्द केल्यास किंवा अन्यत्र प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांना पूर्ण शुल्काचा परतावा देणं संबंधित संस्थेला बंधनकारक राहणार आहे.    विद्यापीठ अनुदान आयोग - यूजीसीनं २०२४-२५ या वर्षासाठी शुल्क परतावा धोरण जाहीर केलं आहे. त्यात पूर्ण परताव्याची तरतूद नमूद करण्यात आली आहे. प्रवेश रद्द केल्यास पूर्ण शुल्क परत मिळत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर यूजीसीनं ही उपाययोजना केली आहे. केंद्र किंवा राज्य सरका...